जगण्याला आणि काय हव...
सुरुवात एक सुंदर असा दृष्टांत देऊन करतो-
एका भल्या मोठय़ा शहरांमध्ये एक प्रसिद्ध चित्रकार राहत होता. त्याने एके दिवशी सुंदर अस चित्र रेखाटन करून ते शहराच्या मुख्य चौकात लावून दिल आणि त्याखाली कमेन्ट बॉक्स म्हणजेच ज्या कोणाला या चित्रांमध्ये चुकीच वाटेल तिथे खुण करा अस वाक्य लिहून टाकले.
तो दिवस निघून गेला, दुसर्या दिवशी त्या चित्रकाराने पाहिले तर त्याचे पूर्ण चित्र खराब झाल होत. कशाने तर लोकांच्या कमेन्ट ने. यावर त्याला खूप वाईट वाटले आणि तो स्वतःशीच पुटपुटला "करायला गेलो एक आणि झाल एक" आणि तसाच तो निराश होऊन घरी चालू लागला.....काही अंतर पुढे गेल्यावर वाटेत त्याला त्याचा मित्र भेटला आणि त्याला उदासीनतेवर विचारताच त्याने त्याला घडलेला सर्व किस्सा सांगितला.
यावर त्याचा मित्र उत्तरला, उद्या असच एखाद चित्र बनवून तिथेच लाव आणि यावेळेस कमेन्ट म्हणून लिही की जाला कोणाला या चित्रांमध्ये काही कमी वाटते त्याने ती बरोबर करा.आणि खरच यावर अस झाल की दुसर्या दिवशी त्यावर एकही कमेन्ट मार्क नव्हता. म्हणजेच...? चुका शोधता येतात मात्र एखाद्याला दुरुस्त करताना मात्र खूप कष्ट होतात.
जग जेव्हा म्हणत असत की सगळ काही संपलय आता... पण जिद्द हळूच कानात म्हणत असते अजून एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे, आणि हे बरोबर देखील आहे.
आपल जिवन म्हणजे एखाद्या आईस्क्रीम प्रमाणे आहे, खाल्ल तरी वितळणारच आहे ठेवल तरी वितळणार. आणि असच काही आहे आपल्या आयुष्याच. त्यामुळे लोकांच मनावर घ्यायचं सोडून द्या आणि बस जिवन जगायला शिका.
कारण - चलती का नाम गाडी है,और रुकती का नाम अनाडी है.
यासाठी कायम चालत रहा- दुनिया पीछे पीछे चलेगी.
-सुदन जाधव
Superb
ReplyDeleteVery Nice Sirji...
ReplyDelete