एक वर्ष एका पुस्तका सारख असतं. नवीन वर्ष आणि नवीन पुस्तक, आणि पुस्तकातले प्रत्येक पान म्हणजे आपला रोजचा दिवस. पुस्तकातल प्रत्येक एक पान वर्षाच्या प्रत्येक एका दिवसाने भरलेल असतं. मग ते पुस्तक लिहिणारे ही आपणच आणि वाचणारे ही आपणच. आयुष्यात आलेली सुख-दुःख आपल्यापरीने रंगवतात. कधी सुखाच्या प्रसंगी कविता तर दुःखाच्या प्रसंगी आसवे...
आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग रंगवताना केलेली पुस्तकावर कलाकारी काही औरच. जस की पाठ्यपुस्तकात अधेमधे येणारे रंगीत संगीत चित्रे आणि त्याखाली लिहलेली टिप्पणी.
आयुष्य जगत असताना काही गोष्टी मनाला स्पर्श अशा करतात, जस की पुस्तक वाचताना एखाद पान आवडल्यास पानाला केलेला फोल्ड ऑर त्या त्या ओळीला मारलेला हायलाइट.
त्यामुळेच त्या पुस्तकाला तितक महत्व प्राप्त होत...
सरत्या वर्षाला निरोप देताना त्या वर्षी तयार झालेल्या पुस्तकालाही समाधानाने बंद करून आपल्याला मनाच्या कपाटात ठेवायचं असतं आणि मनमुराद पणे नवीन वर्षाच्य पुस्तक रेखाटायला घ्यायचं असतं. मागील वर्षाच्या पुस्तकापेक्षा नवीन वर्षाचं पुस्तक हे जास्त सुंदर लिहू हे मनाशी पक्के करूनच....
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर ...
येणारे वर्ष सर्वाना सुखाचे आणि आरोग्यदायी लाभो हीच प्रार्थना...
नवीन वर्ष, नवीन भावना, नवीन संधी....तीच स्वप्ने आणी नवीन सुरुवात...
लाईफ मे ट्रबल तो होगा ही , क्यूँकी जिंदगी की हर सुबह कुछ शरते लेकर आती है.....और जिंदगी की हर शाम ,एक तजुरबा देकर जाती है....Its gives you EXPERIENCE 😊
पुढच्या पानावर काहीतर भारी लिहल असेल या आशेवर मागचे पान झाकत जाणे म्हणजे आयुष्य ...
Beginning of the new CHAPTER...
सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...👣2024.
-सुदन जाधव
🥀✌💯💬happy new year sir in advance 🤗💬💬💬💬💬
ReplyDelete💥💯superb bro..
ReplyDeleteMust sir 👌👌👌
ReplyDeleteKhup chan bhauji,....May the New Year 2022 bring you more happiness, success, love and blessings!
ReplyDeleteNice Sir Happy New Year
ReplyDelete