Thursday, January 6, 2022

इजिरा एक रहस्य...

      न ,वारा,पाऊस आणि निसर्गाच चक्र  हे कायम चालूच असत. निसर्गाच चाललेलं रोजच रुटीन यामुळेच पृथ्वी आजवर समर्थपणे उभी आहे.

     हे निसर्गाच जलचक्र चालू असताना कित्तेक मनमोहक तसेच भयानक दृश्य पाहावयास आपल्याला मिळतात. त्यामधे पाऊस, वीज, ओढे, नाले, नद्या आणि समुद्र...ईत्यादी याचे नवे रूप पाहायला मिळते. पाऊस पडत असताना होणारी वीज ही काही आपल्यासाठी नवीन नाही. दोन ढगांमध्ये विद्युत दाब तयार झाल्यास वीज तयार होऊन ती आकाशात सगळीकडे पसरते आणि चमकते. आणि जमीन आणि ढगांमध्ये विभावाअंतर तयार झाल्यास वीज खाली जमिनीवर कोसळते.

     पाऊस पडत असताना चमकणारी वीज किती प्रकाशमान असते आणि धडकी भरवते ते आपणास ठाऊक आहेच. जेव्हा वीज जमिनीवर पडते तेव्हा काही नुकसान करून जाते.  झाडावर, घरावर, प्राण्यांच्यावर, कधीकधी मोकळ्या रानात- माळावर.

     पण कधी- कधी पडणारी वीज आयुष्यभरासाठी एक चमत्कार घडवून जाते. हो आपण बरोबर वाचताय... आपण ऐकल असेल आपल्या आजी- आजोबा, पणजी- पणजोबा यांच्याकडून की तो खड्डा असा तयार झाला , तमुक तयार झाला.

     असच काही जेव्हा वीज जमिनीवर पडते, तेव्हा दगड फोडून खड्डा पडतो आणि दगडाला तडे जातात. आणि काही कालावधी नंतर तिथे पाणी पाझरायला लागते आणि लहान पाण्याचा डबका बनून जातो यालाच ग्रामीण भाषेत इजिरा म्हणतात. 

इजिरा ही एक नैसर्गिक देणगी आहे. या पाण्याचा वापर पूर्वापार पासून खूप लोकांसाठी अमृत म्हणून काम करत. वाटसरू ची तहान, गुरे राखणारे आणि त्यांच्या जनावरांना पाणी, रात्री च्या वेळेस भित्र्या प्राणांची  तहान सुद्धा हीच इजिरा भागवते.

आपण देखील आपल्या आसपास डोंगर, रानावनात असे कित्तेक पाण्याचे डबके पाहिले असणारच. काहीजण म्हणत पण असतील पहा, रामायणात रामाने मारलेला बाण ईथे लागला म्हणून पाणी लागल इथे, किंवा कृष्णाने मांडलेल्या खेळाने.

पण मित्रानो इजिरा हा विजेमुळे जमिनीवर तयार झालेला नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे. आपल्या आसपास असल्यास अवश्य भेट द्या आणि त्याचे संवर्धन करा.




-सुदन जाधव 

No comments:

Post a Comment

सरत्या वर्षाला निरोप देताना...

      ए क वर्ष एका पुस्तका सारख असतं. नवीन वर्ष आणि नवीन पुस्तक, आणि पुस्तकातले प्रत्येक पान म्हणजे आपला रोजचा दिवस. पुस्तकातल प्रत्येक एक प...