Saturday, January 15, 2022

उडान...

      एक राजा आपल्या सुखी राज्यामध्ये फेरफटका मारत असताना त्याला बाजारात दोन गरुडाची पिल्ले विकायला बसलेला कुबड आलेला, कपाळावर सुरकुत्या ,झिरझिरीत धोतर आणि त्यावर मुंडे असा त्याचा पेहेराव असलेला गरीब म्हातारा दिसला. राजाना पाहताच त्याने मुजरा केला, तसा राजा त्याच्याकडेच येत होता कारण त्याला ते दोन गरुड पक्षी खूप आवडले होते. राजाने त्याला सोन्याच्या मोहरा दिल्या आणि ते दोन पक्षी घेऊन गेला.

    राजाने त्या दोन गरुड पक्ष्यांच्या संगोपनाची जबाबदारी एका उत्तम व्यक्तीकडे सोपवली होती. दोनही पक्षी दिसायला खूपच मस्त होती. बघता बघता दोन्ही गरुड मोठे झाले आणि अगोदर पेक्षा खुपच सुंदर दिसू लागले.

     जेव्हा राजाला वाटले की दोन्ही गरूड दिसायला तर छानच आहेत पण आज त्यांची गरुडझेप पन पाहून बघुया म्हणून त्याने सेवकास सांगून गरुडाना मोकळे सोडले. तशी ती दोन्ही गरूडे आकाशात झेप घेतली. एक उंचच उंच गेला तर एकाने काही अंतरावर जाऊन परत एका फांदीवर येऊन बसला.


     खूप जण आले आणि प्रयत्न केले त्या गरुडाला उडण्यासाठी पण तो काही उंच जायचा आणि परत त्याच फांदीवर येऊन बसायचा. आता मात्र राजाला काही समजेना दोघंही एकत्र मोठी झाली पण एक असा आणि एक असा....कस काय शक्य आहे.

अस म्हणून त्याने दवंडी पेटवली की..जो कोणी या गरुडाला आकाशात उडवून दाखवेल त्याला 50 सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून दिल्या जातील.खूप हुशार, चतुर, पराक्रमी ईत्यादी व्यक्तीनी प्रयास करून सुद्धा जैसे थे व्हायचे. जरा उंच जायचा आणि परत येऊन त्या फांदीवर तो बसायचा आणि पहिला गरुड मात्र उंच आकाशात जाऊन पतंगाप्रमाणे नाहीसा व्हायचा.

     हे सर्व अस होत असताना राजा मात्र नाराज होऊन आपल्या महालात निघून गेला. काही काळ गेल्यावर एक सेवक धापा टाकत आला आणि राजाला आनंदाने सांगू लागला... आपला तो तो...आपला तो... अरे काय आपला तो असे राजा विचारताच त्याने सांगितले की दुसर्‍या गरुडाने सुद्धा आकाशात भरारी घेतली.

यावर राजा खुश झाला आणि ज्याने कोणी हा पराक्रम केला त्याला उद्या सभेत हजर राहण्यास सांगितले. 

सभा भरली ,समोर एक वृद्ध शेतकरी उभा होता, ज्याच्या कडून राजाने पिल्ले लहान असताना घेतली होती. राजाने त्या शेतकर्‍याला सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून दिल्या. आणि विचारू लागला जे दुसरे कोणीच करू शकले नाही ते तू कस काय केलंस...?

त्यावर तो उत्तरला,...महाराज मी बस् पाहत होतो तो गरुड यायचा आणि त्या फांदीवर बसायचा. म्हणून मी ती फक्त झाडाची फांदीच तोडून टाकली. त्यावर तो गरुड देखील आपल्या साथीदारांसह आकाशात भरारी घेऊ लागला.....यावर सर्व दरबार वाहवा करू लागला.

तात्पर्य काय?  तर, आपण देखील आपल्या मध्ये असणार्‍या गुणवत्ता, क्षमतेच्या जोरावर न जाता,आहे तेवढ्यातच समाधानी राहण्याचा विचार करत असतो. म्हणजेच तसच की म्हणतात ना"सरड्याची धाव कुंपणापर्यंत" याला अनुसरून वागत आहोत पण आतून आहोत खूप ध्येयाने वेडे.

आपल्यातील काही विद्यार्थी पण तसेच आहेत वर्गात, शाळेत, गावामधे जरी आपण हुशार,उत्तम विद्यार्थी असलो तरी शहरातल्या गर्दी मध्ये गेल्याशिवाय आपल अस्तित्व समजत नसत तसच काही.

आपल्या मध्ये खूप मोठी ताकद आहे ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी. आपण मात्र तिथ पर्यंत पोहचण्याचा साधा विचार सुद्धा करत नसाल तर शेवटी आपण पण तो दुसरा गरुडच!

प्रयत्न करत रहा, यश निश्चित मिळेल. 

पण प्रयत्न करत असताना ध्येयाला आणि ध्येय साध्य झाल्यावर मदतीचा हात दिलेल्या लोकांना कधीच विसरू नका.

You can do it....



सुदन जाधव 

No comments:

Post a Comment

सरत्या वर्षाला निरोप देताना...

      ए क वर्ष एका पुस्तका सारख असतं. नवीन वर्ष आणि नवीन पुस्तक, आणि पुस्तकातले प्रत्येक पान म्हणजे आपला रोजचा दिवस. पुस्तकातल प्रत्येक एक प...