Sunday, December 31, 2023

सरत्या वर्षाला निरोप देताना...

      क वर्ष एका पुस्तका सारख असतं. नवीन वर्ष आणि नवीन पुस्तक, आणि पुस्तकातले प्रत्येक पान म्हणजे आपला रोजचा दिवस. पुस्तकातल प्रत्येक एक पान वर्षाच्या प्रत्येक एका दिवसाने भरलेल असतं. मग ते पुस्तक लिहिणारे ही आपणच आणि वाचणारे ही आपणच. आयुष्यात आलेली सुख-दुःख आपल्यापरीने रंगवतात. कधी सुखाच्या प्रसंगी कविता तर दुःखाच्या प्रसंगी आसवे...

     आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग रंगवताना केलेली पुस्तकावर कलाकारी काही औरच. जस की पाठ्यपुस्तकात अधेमधे येणारे रंगीत संगीत चित्रे आणि त्याखाली लिहलेली टिप्पणी.

     आयुष्य जगत असताना काही गोष्टी मनाला स्पर्श अशा करतात, जस की पुस्तक वाचताना एखाद पान आवडल्यास पानाला केलेला फोल्ड ऑर त्या त्या ओळीला मारलेला हायलाइट.

त्यामुळेच त्या पुस्तकाला तितक महत्व प्राप्त होत...

    सरत्या वर्षाला निरोप देताना त्या वर्षी तयार झालेल्या पुस्तकालाही समाधानाने बंद करून आपल्याला मनाच्या कपाटात ठेवायचं असतं आणि मनमुराद पणे नवीन वर्षाच्य पुस्तक रेखाटायला घ्यायचं असतं. मागील वर्षाच्या पुस्तकापेक्षा नवीन वर्षाचं पुस्तक हे जास्त सुंदर लिहू हे मनाशी पक्के करूनच....

भले बुरे जे घडून गेले 

विसरून जाऊ सारे क्षणभर 

जरा विसावू या वळणावर ...

येणारे वर्ष सर्वाना सुखाचे आणि आरोग्यदायी लाभो हीच प्रार्थना...

नवीन वर्ष, नवीन भावना, नवीन संधी....तीच स्वप्ने आणी नवीन सुरुवात...

लाईफ मे ट्रबल तो होगा ही , क्यूँकी जिंदगी की हर सुबह कुछ शरते लेकर आती है.....और जिंदगी की हर शाम ,एक तजुरबा देकर जाती है....Its gives you EXPERIENCE 😊

पुढच्या पानावर काहीतर भारी लिहल असेल या आशेवर मागचे पान झाकत जाणे म्हणजे आयुष्य ...

Beginning of the new CHAPTER...

सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...👣2024.




-सुदन जाधव 

Saturday, March 5, 2022

चॅट ट्रेन्ड....

 नमस्कार मित्रांनो,

आज घेऊन आलो आहे दैनंदिन ,प्रत्येक मिनिटांचा आपला सोबती मोबाईल आणि त्यामधे वापर होणार्‍या whatsapp या app आणि काही chat / स्टेटस ट्रेंड बद्दल...

     तर या app चा वापर आपण प्रामुख्याने एकमेकांशी संवाद, फोटो, विडिओ, डॉक्युमेंट्स ईत्यादी गोष्टींची देवाण- घेवाण करण्यासाठी करत असतो.  गरज असते ती फक्त इंटरनेटची. डेटा पॅक असेल तर अनलिमिटेड चॅट करू शकतो. नाहीतर एक काळ असा होता की काही फोटो, फाईल ट्रान्सफर करायला इंटरनेट कॅफे चा रस्ता धरायला लागायचा.  कोणी GF-BF असतील तर फक्त टेक्स्ट मेसेज करायचा आणि त्याने पाहिलाय की नाही याच उत्तर पण तेव्हाच कळायचे जेव्हा तिकडून उत्तर यायच... ते ही दिवसाला 100 एसएमएस फक्त आणि आत्ता बोलता बोलता कधी 1000 एसएमएस होतात समजत सुद्धा नाही कारण.... अनलिमिटेड ला किम्मत नसते 😜


गेले काही दिवस ट्रेंड च चालू आहे म्हणजे...

स्टेटस ठेवायचे भरमसाठ, त्यातले काही दिसतात दुसर्‍याला तर काही नाही. स्टेटस दिसला तर समोरचा व्यक्ति समजतो की, माझा नंबर सेव आहे त्याच्याकडे. पण याच्या पलीकडे म्हणजे काही स्टेटस फक्त आणि फक्त ठेवतात ते काही खास लोकांना दाखवण्यासाठी...

म्हणजे... स्टेटस लावलेला असतो पण 24 तास व्हायचे तर आहेत पण डिलीट...का तर ज्याच्यासाठी स्टेटस लावला त्या व्यक्तीने तो पहिला म्हणजे त्या स्टेटस च काम पूर्णत्वास आलेल आहे 😆

जो काही संदेश, भावना, दुःख, सुख, ईर्षा, द्वेष, आपुलकी, सहवास त्या स्टेटस वरुन सांगायचा होता तो त्या व्यक्तीने समजून घेतला असेल....भारी ना 😊

पण मित्रांनो...समोरचा व्यक्ति तुम्ही चॅट करत असताना...hmm, ok,br, ho...असा उत्तर देत असेल तर समजून जा ...

तो दुसर्‍या कोणामध्ये चॅट करण्यात व्यस्त आहे किंवा तो कामात व्यस्त असेल. नाहीतर समजून जा की तुमच्याशी बोलण्यात त्याला काही इंटरेस्ट नाहिये, पण दुखवायला नको म्हणून एक फॉरम्यालिटि म्हणून फक्त हा ला हा मिळवत असेल....

तुम्हीपण अस कुणासाठी करत आहात का? किंवा तुमच्यासोबत सुद्धा अस कधी घडलं आहे का...?

Pls comment....😃


 टीप- वरील लेखणीचा आणि कोणाच्याही व्यक्तिगत चॅटशी काहीही संबंध नाही तसा आढळल्यास फक्त योगायोग समजावा. 



- सुदन जाधव 


Wednesday, February 23, 2022

नाणं...

      11 वाजायला अवघ्या 20 मिनिटांचा कालावधी राहिलेला तोवर अनाउन्समेंट झाली आज गाडी 2 तास उशीरा चालेल. हे ऐकल्यावरच कपाळावर आठ्या आणून तो हताश झाला. अर्थात तो पाश्चिम महाराष्ट्रतल्या मोठ्या रेल्वे स्टेशनवर आपल्या गाडीची वाट पहात बसला होता. गाडी लेट आहे समजल्यावर थोडा टाइमपास म्हणुन आपल्या जागेवरून तो उठला...

     फलाटावरून त्याच्या येरझारया चालू होत्या. तशी स्टेशनवर जेमतेम गर्दी होती, कोरोना मुळे असेल कदाचित ,रोजच्या सारखी रेलचेल अजूनही चालू झाली नव्हती. प्रत्येकाच्या पेहरावावरुन वेगवेगळ्या  परराज्यातील मानस दिसत होती. कोण मराठी, कोण कन्नड, तामिळ, हिंदी असा बोलत होता. म्हणतात ना भारतात प्रत्येक कोसा दीड-कोसाला माणसाची भाषा आणि वेषभूषा बदलते याच उत्तर उदाहरण म्हणून समजा.

     थोड लांब चालत गेल्यावर फलाट बदलायच्या शिडीच्या शेजारी एक मुलगा तसा काही फार मोठा नव्हता ,जेमतेम 10-12 ला असेल कदाचित , बूट पॉलिश करत बसला होता. याच्या पायातील बूट पाहून त्याने विचारले 'साहेब बूट पॉलिश करायचे का..? यावर त्याने प्रथमतः नकार दर्शवला पण त्याच फलाटावरून परत येताना त्याने आपला रोख त्याच्याकडे वळवला.

     याने स्वताचे बूट पॉलिश करून घेतले, पॉलिश केल्यावर बूट चमकू लागले होते. सेम आहे बर का... आपल्याला पण चमकायचे असेल तर कायम अपडेट राहील पाहिजे. असो, पैसे विचारताच त्याने 20 सांगितले तसे याने 10-10 रुपयाचे दोन नाणे खिशातून काढले आणि त्याला देणार तोवर त्याच्या हातून एक नाणे खाली पडले....त्यावर तो मुलगा काही फिल्मी अंदाजात म्हणाला "गीरे हुये पैसे में नही उठाता" म्हणजे ते दीवार पिक्चर मध्ये अमिताभ सर करतात ना तसे.

     यावर हा....अरे तुम्ही लोक पण ना,पिक्चर बघून बघून जगता वास्तवात तस काहीही नसत. तू म्हणतोस त्या पिक्चर मध्ये नंतर अमिताभ खूप मोठे होतात ते ही वाईट, चुकीच्या मार्गाने. तू सुद्धा अशीच स्वप्नं बघतोयस का...? याने आपले तत्त्वज्ञान पाजळायची संधी नाही सोडली.

     अरे साहेब माहीत आहे मला तो मुलगा बोलू लागला.. पिक्चर खरे नसतात म्हणून तर बागबान मधल्या अमिताभ सारख कोणी दत्तक घेईल म्हणून वाट न बघता मेहनत करतोय. सबंध दिवसात ईतक कमावतो की त्यामुळे माझ्या आईला दुसरीकडे कोणत काम कराव लागत नाही. त्याचबरोबर ओपन कॉलेज मधून बारावी सुद्धा करतो आहे.

     हे ऐकत असतानाच खाली पडलेल नाणे याने अलगद उचलून त्याच्या हातावर ठेवत हा म्हणाला...मला माहिती आहे तू जीवनात खूप प्रगती करशील कारण तुझ्याजवळ आई आहे आणि जिद्दही.....



-सुदन जाधव 

Tuesday, February 22, 2022

दैवत छत्रपती शिवाजी महाराज...

     नुकताच एक सिनेमा प्रदर्शित झाला, अखंड हिंदुस्तानचे श्रद्धास्थान, दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शिलेदार यांच्यावर आधारित पन्हाळा ला घातलेल्या सिद्धी च्या विळख्यातून सुटून वीर शिवा काशिद (प्रतिशिवाजी) आणि 'घोडखिंडीत' अखेरच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत केलेली मावळ्यांची शर्त...

      तसा त्याला सिनेमा, सिरियल, वेब सिरीज पाहण्याच वेड कमीच. पण आपल्या आवडत्या विषयावर आधारित कोणता सिनेमा आला तर तो तसा आवर्जून पाहणारा. असाच दैनंदिन कामातून वेळ काढून त्याचे सिनेमा पहायला जायचे ठरले. रात्रीचे तिकीट बूक केल्यामुळे ऑफिस काम आवरून मस्त रात्रीचे जेवण आटपून तो सिनेमा पहायला गेला.

     सिनेमा पहायला शिवप्रेमींची गर्दी खूपच दिसत होती, बूकिंग विंडो वर खूप गर्दी होती. तिकीट खरेदीसाठी एकच झुंबड ,त्यातच एकटा ओरडला तिकीट संपले आणि त्याने हाऊसफुल्ल असा बोर्ड लावला आणि विंडो बंद झाली.याचे तिकीट अगोदरच बूक असल्यामुळे तिकीट घेण्याचा काही प्रश्नच नव्हता.

सिनेमा चालू झाला, महाराजांची एंट्री प्रथमदर्शनी झाली. प्रत्येक व्यक्तीने आपापले पात्र उत्तमरीत्या रंगवले होते. बाजी, फुलाजी रायजी ,बहिर्जी, शिवा, बांदल ईत्यादी....अर्ध्यावर सिनेमा येऊन पोहोचला होता उत्सुकता होती ती महाराजांच्या सलामत सुटकेची. आणि तो प्रसंग आलाच...

स्वराज्याचा तिसरा डोळा, बहिर्जी नाईक यांच्या उत्तम नियोजना प्रमाणे महाराज एका पालखीत बसुन तर दुसर्‍या पालखीत प्रति शिवाजी म्हणून ओळखला जाणारा सूदमुद शिवाजी महाराजांसारखा दिसणारा वीर शिवा काशिद बसणार होता.....एक पालखी विशाल गडाच्या दिशेने तर दुसरी सिद्धी ला गाफील ठेवण्यासाठी त्याच्याच रोखाने पालखी शिवा काशिद यांची... ज्या ठिकाणी त्या दोन पालख्यांचे रस्ते विभागनार होते तेथे महाराज पालखीतून खाली उतरले व शिवा काशिद यांना आपल्या सोबतच विशाल गडाकडे येण्यास आग्रही केले, परंतु....ऐकणार तो मावळा कसला, आपल्या राजावर जीव ओवाळून टाकायला मागेपुढे न पाहणारी... राजांना पाहून शिवा म्हणतो कसा... माझ अणि माझ्या कुळाच नशीब राजे, मी शिवाजी महाराज म्हणून मला मरण येणार ,यापेक्षा मोठ भाग्य आणि काय....     

या वाक्यावर याच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला आणि तो आपल्या भूतकाळात हरवून गेला...

     असाच जेव्हा तो कॉलेज मध्ये शिक्षण घेत होता, तेव्हा तो काही महिने आपल्या पाहुण्याच्याकडे रहायचा. पावसाळ्याचे दिवस होते गणपतीचा सन/उत्सव तोंडावर होता. गावातच मोठा श्रीमंत गणेशोत्सव मंडळ होता. प्रत्येक वर्षी गणपतीच्या निमित्ताने आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई बरोबर, देखावा असायचा. यावर्षी काहीतर ऐतिहासिक म्हणून प्रति शिवाजी महाराज आणि प्रति राणी लक्ष्मीबाई यांची घोड्यावरून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. जवळ- जवळ पात्रांची निवड झाली होती....

दिवस उजाडला , सगळ्यांना ओढ लागली होती ती सायंकाळच्या मिरवणुकीची. बघता- बघता दुपार टळून रात्र होऊ लागली. आणि एकच धांदल उडाली. सगळेजण महाराजांची मिरवणूक म्हणून गावभर सडा, रांगोळ्या, रस्तावर फुलांची आरास करू लागले...

शिवाजी महाराजांचे ज्यानी पात्र केले होते त्यांना आवरण्याचे किवा मेकअप चेक काम याच्याकडे सोपवले होते....राजांचे सर्व अलंकार जडीत पोषाख आणला होता. मेकअप चे काम चालू झाले. तास उलटून गेला, लहान-लहान मुले गर्दी करून खिडकीतून डोकावून पाहत होती. मोठ्यांच्या येरझारया वाढत होत्या. लवकर आवरण्यासाठी याचा प्रयत्न चालू होता.

     अंगावर पोषाख चढवून झाला होता, चेहर्‍यावरचा मेक अप झालेला. राहिला होता तो फक्त डोक्यावर टोप चडवायचा. इतक्यात एकाने काही करेक्शन करता मेकअप चालू केला. तोवर याने नकळत पणे टोप आपल्या डोक्यावर चढवला आणि आरश्यात पाहू लागला आणि मानत विचार करू लागला की मी पण थोडफार महाराजांसारखे दिसतो का..? 

   कोणाची तर नजर याच्यावर पडली. आणि तो धावत आला तोवर याने टोप आपल्या डोक्यावरून काढला होता. धावत आलेल्या व्यक्तीने पुन्हा तो टोप डोक्यावर चढवायला लावला आणि आणि तो तसाच धावत जाऊन आणखीन काही 5-6 लोकांना घेऊन धावत परत आला . सगळे अवाक् झाले...म्हणजे पात्र करतोय एक, पण त्याच्यापेक्षा हा कितीपटीने तरी मिळतेजुळता दिसत होता महाराजांसारखा....सगळ्यांचा संगनमताने यालाच महाराज करायचे ठरले तसाच यांच्या डोळ्यातून आनंदाश्रूनी आपला मार्ग तेव्हाच मोकळा करून घेतला होता.... त्यादिवशी गावभर घोड्यावरून प्रति शिवाजी महाराज म्हणून राजांंची मिरवणूक निघाली सर्वानी राजांचे औक्षण केले. राजांच्या प्रति असणारे प्रेम सर्वाच्या चेहर्‍यावरून दिसत होते, लहान-मोठय़ा मुलांचा शिवाजी महाराज की जय हा जयघोष थांबत नव्हता. त्याला स्वताचे भान राहिले नव्हते सगळे ओरडत होते, पुढे लेझीम चा खेळ चालू होता. हे पाहून त्याची छाती फुगली होती.... आज तो, तो राहिला नव्हता त्याच्या रूपाने सर्वांना शिवाजी महाराजांचे दर्शन घडत होते...

     मित्रानो कित्तेक लहान मुलांना स्पाइडरमेन, शक्तिमान, सुपरमॅन, यांचे कपडे आवडतात आणि घेतात, घालतात पण शिवाजी महाराजांचा पोषाख जेव्हा अंगावर चडतो तेव्हा त्याचा आदर आणि आनंद काही वेगलाच असतो...

इतक्यात शिट्याच्या आणि जयघोषाच्या मोठ्या आवाजाने हा भानावर आला... पण यांच्या जीवनात अचानक पणे घडून आलेला आणि शिवाजी महाराज बनण्याचा योगायोग या जीवनात घडून गेला यावर त्याने देवाचे आभार आणि धन्यता मानली....



- सुदन जाधव 

Sunday, February 20, 2022

गरज...

      काळी-सकाळी दोघींच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. गप्पा कसल्या हेच की काय चाललय, हा आणि होय इतकच तासभर चालू होत. त्यात आज शनिवार IT सेक्टर ला वीकेंड म्हणून शनिवार-रविवार ऑफ असतो. म्हणूनच कायतर यांच्या गप्पा काय थांबत नव्हत्या. त्यातच एकटीने शॉपिंग चा विषय काढला. विषय काढला रे काढला तसाच तिच्या नवर्‍याने एका कटाक्षाने तिच्याकडे पाहत तिरस्कार प्रति स्मायल दिली (आज आणि दिवाळी निघते वाटत...! असा मनाशीच बोलला असेल तो कदाचित). दोघी कुणाच्या तरी कार्यक्रम मध्ये जाण्यासाठी ड्रेसअप वर बोलत होत्या.

त्यात एकीने हिंट दिली...अमुक अमुक ठिकाणी ड्रेस छान मिळतात. तसाच मनात शॉपिंग चा इरादा पक्का करत कसातर करत यांचा कॉल संपला.

     नवर्‍याला लाडीगोडी लावत गाडी सुसाट निघाली ती शॉपिंग मॉलकडे. तिथे गेल्यावर खरच तिच्या मैत्रिणीने सांगितल्या प्रमाणे खूप मस्त आणि आकर्षक डिझायन मध्ये सर्व प्रकारचे ड्रेस तिथे उपलब्ध होते.त्यातला एक ड्रेस पसंद पडला तो होता 2000 रुपये चा. तसा काही महाग वैगेरे याचा काही प्रश्न नव्हता तिच्यासाठी. 

      पण बोलणार नाही मग तो नवरा कसला.... तिच्या नवर्‍याने मधेच एक टोमणा मारला- असा सेम ड्रेस तर आहे तुझ्याकडे मग आणि हा कशासाठी एक असताना? तसा त्याचा प्रश्न साहजिकच बरोबर होता कारण हिच्याकडे सेम ड्रेस होता. त्यावर ती बोलली सेम काय म्हणता डिझाईन बघा डिझाईन जरा वेगळी वाटत नाही तुम्हाला (यांच सर्व बोलण ड्रेस फायनल आणि बिलिंग काऊंटर वर चालू होत).

पण का कुणास ठाऊक तिने तो ड्रेस परत ठेवून दिला आणि ते दोघेही त्या मॉल मधून बाहेर पडले. 

बाहेर येत असताना दोघांच संभाषण चाललेलं होत. 

नवरा- अग, सेम ड्रेस होता तर दुसरा घ्यायची होतीस. 

ती- नको घेईन परत कधितरी.

नवरा- मनाला लावून नको घेऊ पण एक बोलू का?

ती- हो बोला ना. 

नवरा- आपल्या घरांमधे जी कामवाली काकी येतात त्यांना आपण महिन्याला 2000 रुपये देतो. म्हणजेच त्यांची 30 दिवसांच्या मेहनतीची कमाई 2000 रुपये आहे. आणि आपण पैसे आहेत म्हणून तेवढी रक्कम एका मिनिटात खर्च करत होतो. 

ती- अनुत्तरीत.....

     असचं चालत-चालत पार्किंग जवळ दोघेही पोहोचले. तिथे एक इसम सावलीला बसला होता. अंगावर जुनाट टीशर्ट तो ही मळलेला ,कुणीतरी दिलेला बरमुडा (बसत नसताना सुद्धा कंबरेला सुतळीच्या सहाय्याने बांधलेला होता).

     जवळ मोडकळीस आलेली सायकल त्यावर अडकवलेल्या 10-12 बोचक्या, अन्न असलेल्या प्लास्टिक पिशव्या. हे दोघे गाडी काढत असताना त्याने यांचेकडे पाहून काहीतर बोलणार तेवढ्यात ते गाडी चालू करून पुढे सुद्धा निघून गेले होते.पण हे त्या दोघांना सुद्धा ते जाणवलं होत की त्याला काहीतर बोलायच होत...

     त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी परत फिरवली आणि परत त्या इसमा जवळ पोहोचली. आणि विचारू लागले तुम्ही काही बोलणार होता का आमच्याशी...? तर त्यावर त्याने अचंबित करणारा प्रश्न केला...तुम्ही...या गावचे आहात का? यावर त्या दोघांनीही होकारार्थी मान डोलावली. नंतर त्याने सांगितले मी पण त्याच गावचा आहे. खोलवर विचारपूस केली असता तो त्यांचा गावाशेजारचा निघाला. ईथे इमारतीच्या शहरात मिळेल तिथे झाडलोट ईत्यादी काम करतो अस त्याने सांगितले....

थोड मनाला आणि गावाकडचा आपला माणूस म्हणून त्यांनी थोडी मदत म्हणून त्यांना काही पैसे देऊ केले पण त्याने ते नाकारले. (कष्ट केलेल्या हाताला फुकटचे घेणे कदाचित पटत नसावे). पण यांच्या हट्टापायी त्याने आणि मुलाप्रमाणे समजून घ्या अस बोलल्यावर त्याने ते स्विकारले.

     ते दोघेही तिथून निघाले...गाडी चालू झाली, रस्तावर धावू लागली. 20-25 मिनीट झाले पण दोघेही गप्प होते. 

कदाचित दोघेही मनातून खुश असतील कारण त्यांच्या पैशाचा अपव्यय टाळून एक नकळत चांगल काम त्यांच्या हातून सहजच घडून गेल होत....तिच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत होता, ती सांगू पण शकत नव्हती आणि काहीही नाही...कारण तिच्या 2000 रुपये चा एका गरजवंताला खूप फायदा आणि त्याचा माणसातला माणूस अजून जिवंत आहे यावर चा विश्वास अबाधित राहणार होता...

आपणही असच कोणतीही वस्तु घेताना काहीही न विचार करणारी लोकं... गरजवंत लोकांची भूक नाही समजू शकत. क्रुपया जमेल तेव्हढी मदत करत चला.कारण खाली हात आये थे हम खाली हात जायेगे....




- सुदन जाधव

Saturday, January 15, 2022

उडान...

      एक राजा आपल्या सुखी राज्यामध्ये फेरफटका मारत असताना त्याला बाजारात दोन गरुडाची पिल्ले विकायला बसलेला कुबड आलेला, कपाळावर सुरकुत्या ,झिरझिरीत धोतर आणि त्यावर मुंडे असा त्याचा पेहेराव असलेला गरीब म्हातारा दिसला. राजाना पाहताच त्याने मुजरा केला, तसा राजा त्याच्याकडेच येत होता कारण त्याला ते दोन गरुड पक्षी खूप आवडले होते. राजाने त्याला सोन्याच्या मोहरा दिल्या आणि ते दोन पक्षी घेऊन गेला.

    राजाने त्या दोन गरुड पक्ष्यांच्या संगोपनाची जबाबदारी एका उत्तम व्यक्तीकडे सोपवली होती. दोनही पक्षी दिसायला खूपच मस्त होती. बघता बघता दोन्ही गरुड मोठे झाले आणि अगोदर पेक्षा खुपच सुंदर दिसू लागले.

     जेव्हा राजाला वाटले की दोन्ही गरूड दिसायला तर छानच आहेत पण आज त्यांची गरुडझेप पन पाहून बघुया म्हणून त्याने सेवकास सांगून गरुडाना मोकळे सोडले. तशी ती दोन्ही गरूडे आकाशात झेप घेतली. एक उंचच उंच गेला तर एकाने काही अंतरावर जाऊन परत एका फांदीवर येऊन बसला.


     खूप जण आले आणि प्रयत्न केले त्या गरुडाला उडण्यासाठी पण तो काही उंच जायचा आणि परत त्याच फांदीवर येऊन बसायचा. आता मात्र राजाला काही समजेना दोघंही एकत्र मोठी झाली पण एक असा आणि एक असा....कस काय शक्य आहे.

अस म्हणून त्याने दवंडी पेटवली की..जो कोणी या गरुडाला आकाशात उडवून दाखवेल त्याला 50 सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून दिल्या जातील.खूप हुशार, चतुर, पराक्रमी ईत्यादी व्यक्तीनी प्रयास करून सुद्धा जैसे थे व्हायचे. जरा उंच जायचा आणि परत येऊन त्या फांदीवर तो बसायचा आणि पहिला गरुड मात्र उंच आकाशात जाऊन पतंगाप्रमाणे नाहीसा व्हायचा.

     हे सर्व अस होत असताना राजा मात्र नाराज होऊन आपल्या महालात निघून गेला. काही काळ गेल्यावर एक सेवक धापा टाकत आला आणि राजाला आनंदाने सांगू लागला... आपला तो तो...आपला तो... अरे काय आपला तो असे राजा विचारताच त्याने सांगितले की दुसर्‍या गरुडाने सुद्धा आकाशात भरारी घेतली.

यावर राजा खुश झाला आणि ज्याने कोणी हा पराक्रम केला त्याला उद्या सभेत हजर राहण्यास सांगितले. 

सभा भरली ,समोर एक वृद्ध शेतकरी उभा होता, ज्याच्या कडून राजाने पिल्ले लहान असताना घेतली होती. राजाने त्या शेतकर्‍याला सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून दिल्या. आणि विचारू लागला जे दुसरे कोणीच करू शकले नाही ते तू कस काय केलंस...?

त्यावर तो उत्तरला,...महाराज मी बस् पाहत होतो तो गरुड यायचा आणि त्या फांदीवर बसायचा. म्हणून मी ती फक्त झाडाची फांदीच तोडून टाकली. त्यावर तो गरुड देखील आपल्या साथीदारांसह आकाशात भरारी घेऊ लागला.....यावर सर्व दरबार वाहवा करू लागला.

तात्पर्य काय?  तर, आपण देखील आपल्या मध्ये असणार्‍या गुणवत्ता, क्षमतेच्या जोरावर न जाता,आहे तेवढ्यातच समाधानी राहण्याचा विचार करत असतो. म्हणजेच तसच की म्हणतात ना"सरड्याची धाव कुंपणापर्यंत" याला अनुसरून वागत आहोत पण आतून आहोत खूप ध्येयाने वेडे.

आपल्यातील काही विद्यार्थी पण तसेच आहेत वर्गात, शाळेत, गावामधे जरी आपण हुशार,उत्तम विद्यार्थी असलो तरी शहरातल्या गर्दी मध्ये गेल्याशिवाय आपल अस्तित्व समजत नसत तसच काही.

आपल्या मध्ये खूप मोठी ताकद आहे ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी. आपण मात्र तिथ पर्यंत पोहचण्याचा साधा विचार सुद्धा करत नसाल तर शेवटी आपण पण तो दुसरा गरुडच!

प्रयत्न करत रहा, यश निश्चित मिळेल. 

पण प्रयत्न करत असताना ध्येयाला आणि ध्येय साध्य झाल्यावर मदतीचा हात दिलेल्या लोकांना कधीच विसरू नका.

You can do it....



सुदन जाधव 

Thursday, January 6, 2022

इजिरा एक रहस्य...

      न ,वारा,पाऊस आणि निसर्गाच चक्र  हे कायम चालूच असत. निसर्गाच चाललेलं रोजच रुटीन यामुळेच पृथ्वी आजवर समर्थपणे उभी आहे.

     हे निसर्गाच जलचक्र चालू असताना कित्तेक मनमोहक तसेच भयानक दृश्य पाहावयास आपल्याला मिळतात. त्यामधे पाऊस, वीज, ओढे, नाले, नद्या आणि समुद्र...ईत्यादी याचे नवे रूप पाहायला मिळते. पाऊस पडत असताना होणारी वीज ही काही आपल्यासाठी नवीन नाही. दोन ढगांमध्ये विद्युत दाब तयार झाल्यास वीज तयार होऊन ती आकाशात सगळीकडे पसरते आणि चमकते. आणि जमीन आणि ढगांमध्ये विभावाअंतर तयार झाल्यास वीज खाली जमिनीवर कोसळते.

     पाऊस पडत असताना चमकणारी वीज किती प्रकाशमान असते आणि धडकी भरवते ते आपणास ठाऊक आहेच. जेव्हा वीज जमिनीवर पडते तेव्हा काही नुकसान करून जाते.  झाडावर, घरावर, प्राण्यांच्यावर, कधीकधी मोकळ्या रानात- माळावर.

     पण कधी- कधी पडणारी वीज आयुष्यभरासाठी एक चमत्कार घडवून जाते. हो आपण बरोबर वाचताय... आपण ऐकल असेल आपल्या आजी- आजोबा, पणजी- पणजोबा यांच्याकडून की तो खड्डा असा तयार झाला , तमुक तयार झाला.

     असच काही जेव्हा वीज जमिनीवर पडते, तेव्हा दगड फोडून खड्डा पडतो आणि दगडाला तडे जातात. आणि काही कालावधी नंतर तिथे पाणी पाझरायला लागते आणि लहान पाण्याचा डबका बनून जातो यालाच ग्रामीण भाषेत इजिरा म्हणतात. 

इजिरा ही एक नैसर्गिक देणगी आहे. या पाण्याचा वापर पूर्वापार पासून खूप लोकांसाठी अमृत म्हणून काम करत. वाटसरू ची तहान, गुरे राखणारे आणि त्यांच्या जनावरांना पाणी, रात्री च्या वेळेस भित्र्या प्राणांची  तहान सुद्धा हीच इजिरा भागवते.

आपण देखील आपल्या आसपास डोंगर, रानावनात असे कित्तेक पाण्याचे डबके पाहिले असणारच. काहीजण म्हणत पण असतील पहा, रामायणात रामाने मारलेला बाण ईथे लागला म्हणून पाणी लागल इथे, किंवा कृष्णाने मांडलेल्या खेळाने.

पण मित्रानो इजिरा हा विजेमुळे जमिनीवर तयार झालेला नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे. आपल्या आसपास असल्यास अवश्य भेट द्या आणि त्याचे संवर्धन करा.




-सुदन जाधव 

Tuesday, December 21, 2021

जीवनगाणे गातच रहावे...

 जगण्याला आणि काय हव...

     सुरुवात एक सुंदर असा दृष्टांत देऊन करतो-

एका भल्या मोठय़ा शहरांमध्ये एक प्रसिद्ध चित्रकार राहत होता. त्याने एके दिवशी सुंदर अस चित्र रेखाटन करून ते शहराच्या मुख्य चौकात लावून दिल आणि त्याखाली कमेन्ट बॉक्स म्हणजेच ज्या कोणाला या चित्रांमध्ये चुकीच वाटेल तिथे खुण करा अस वाक्य लिहून टाकले.

      तो दिवस निघून गेला, दुसर्‍या दिवशी त्या चित्रकाराने पाहिले तर त्याचे पूर्ण चित्र खराब झाल होत. कशाने तर लोकांच्या कमेन्ट ने. यावर त्याला खूप वाईट वाटले आणि तो स्वतःशीच पुटपुटला "करायला गेलो एक आणि झाल एक" आणि तसाच तो निराश होऊन घरी चालू लागला.....काही अंतर पुढे गेल्यावर वाटेत त्याला त्याचा मित्र भेटला आणि त्याला उदासीनतेवर विचारताच त्याने त्याला घडलेला सर्व किस्सा सांगितला. 

     यावर त्याचा मित्र उत्तरला, उद्या असच एखाद चित्र बनवून तिथेच लाव आणि यावेळेस कमेन्ट म्हणून लिही की जाला कोणाला या चित्रांमध्ये काही कमी वाटते त्याने ती बरोबर करा.आणि खरच यावर अस झाल की दुसर्‍या दिवशी त्यावर एकही कमेन्ट मार्क नव्हता. म्हणजेच...? चुका शोधता येतात मात्र एखाद्याला दुरुस्त करताना मात्र खूप कष्ट होतात.

     जग जेव्हा म्हणत असत की सगळ काही संपलय आता... पण जिद्द हळूच कानात म्हणत असते अजून एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे, आणि हे बरोबर देखील आहे.


     आपल जिवन म्हणजे एखाद्या आईस्क्रीम प्रमाणे आहे, खाल्ल तरी वितळणारच आहे ठेवल तरी वितळणार. आणि असच काही आहे आपल्या आयुष्याच. त्यामुळे लोकांच मनावर घ्यायचं सोडून द्या आणि बस जिवन जगायला शिका.

कारण - चलती का नाम गाडी है,और रुकती का नाम अनाडी है. 

यासाठी कायम चालत रहा- दुनिया पीछे पीछे चलेगी.





-सुदन जाधव




Wednesday, December 15, 2021

जुनी गाणी आणि तशाच जुन्या आठवणी ...

    रोजच्या धावपळीतून आणि ऑफिस कामातून कधी सोमवार चा शनिवार होतो समजत सुद्धा नाही...रोजचा दिवस सारखाच समजून सर्वसामान्य माणूस जगत असतो अथवा दिवस पुढे-पुढे ढकलत असतो अस म्हणूया ...

   असाच वीकेंड होता सहज दुपारची वेळ होती, कंटाळा आलेला क्रिकेट मॅच देखील कोणती नव्हती टीव्ही वर. म्हणून टीव्ही कडे लक्ष ही द्यायचा प्रश्न नव्हता...म्हणूनच मोबाईल कडे हात आपोआपच वळला. मोबाईल मध्ये YouTube प्ले करून song ऐकू लागलो...

    काही song प्ले होऊन झाल्यावर कोणात तरी जुन गाणं सुरु झाल... आणि गम्मत म्हणजे गाणं ऐकताना मी कधी माझ्या गत आयुष्यात गेलो हे देखील मला नाही समजले, म्हणजे असे की जुना प्रसंग सगळे आपापल्या कामात आहेत सगळे नॉर्मल पण जसाच्या तसा...?पण तोच प्रसंग किवा त्यावेळेस मला घेऊन जायच कारण...?अचानक का आठवल असेल ते...?

तर कारण अस की मी ज्यावेळी you ट्यूब वर ते गाणं ऐकत होतो तेच गाणं मी माझा भूतकाळातील आयुष्यात ऐकले होतो आणि जेव्हा का मी आता हे गाणं ऐकायला लागलो त्यावेळी तोच आहे तसा प्रसंग आठवला...


हो खरंच असं कित्तेक वेळा माझ्यासोबत होतय... काही गाणी तर अशी भासतात आपण सध्या ईथे नाहीतर भूतकाळात जिथे पहिल्यांदा हे गाणं ऐकलं आहे ,तिथेच आहे.

गाण्याबरोबर एक गोष्ट अजून आहे...जी मला/आपल्याला भूतकाळातील आठवण करून द्यायला पुरेशी आहे.

ती गोष्ट म्हणजे सेंट...

    बघा आपण कुठेतरी प्रवासाला गेला असेल आणि तेव्हा तुम्ही जाताना सोबत सेंट किंवा बॉडी स्प्रे घेऊन गेला असेल आणि तोच सेंट चा सुवास जर तुम्हाला कधी आलाच तर नकळत तुम्ही भूतकाळातील प्रवासात परत हरवून जाल हे नक्की..

त्यामुळे जर तुम्ही कोणता ट्रीप चा प्लॅन करत असाल तर नक्की आवडीची काही गाणी आणि सेंट न्यायला विसरू नका... काही भूतकाळातील गोष्टी फोटो पाहून नाहीतर अश्याही अनुभवास मिळतात.

तुम्हाला ही काही गाणी ऐकल्यावर old memories आठवतात का ..?





- सुदन जाधव 


Tuesday, November 16, 2021

आयुष्याची भटकंती...🚶‍♂️

   टकंती मला  यावर थोड बोलायच आहे. नकळत थोडा मनात विचार येऊन गेला. भटकंती तर सगळेच करतात. हा ,कोण म्हणेल भटकंती म्हणाल तर हिंडणे-फिरणे, किल्ल्यांची सैर, अनोळख्या जागी फिरायला जाणे म्हणजेच मन म्हणेल त्या ठिकाणी आपल्या इच्छेप्रमाणे भ्रमंती करणे.

पण...आयुष्याची भटकंती यावर बोलायच झाल तर मनात कोणता विचार येतो..? आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक जण आपल्यापरीने आपापले आयुष्य जगत असतो.मग, आयुष्याची भटकंती कुणाची चुकली आहे का..? काय भाऊ तू पण ना...

जिने के है चार दिन, बाकी है बेकार दिन...असच काहीतरी वाटलं असेल ना.




आयुष्याची संघर्षाची भटकंती जशी की वेलीवरच्या फुलपाखरा सारखी ...

   म्हणजेच जस फुलपाखरू झाडाच्या खोडावर एक छोटासा मातीचा ढिगारा बनवत आणि त्यामधे प्रथम जन्माला येते ती अळी, आणि काही दिवसानंतर ती अळी बाहेर येऊन त्याच फुलपाखरू बनत त्याचप्रमाणे प्रत्येक जण हा स्वतः च्या आयुष्याला कलाटणी देऊन जगत असतो.

   पण कोणी पाहिल असेल तर, फुलपाखरासारखा चा मातीचा ढिगारा बाहेरुन कोणी पोखरला तर त्याला आत मिळणार ती अळी आणि मात्र तेच जर मातीच कवच आतून फुटले तर त्यातून बाहेर येणार ते सुंदर सगळ्यांना हवहवस, सगळ्यांच लक्ष वेधुन घेणार फुलपाखरू...

त्यामुळे स्वतःच ठरवा, तुम्हाला आयुष्याच्या संघर्षात दुसर्‍यांची मदत घेऊन अळी व्हायचय,की स्वतः लढून फुलपाखरू व्हायचय...





-सुदन जाधव 


सरत्या वर्षाला निरोप देताना...

      ए क वर्ष एका पुस्तका सारख असतं. नवीन वर्ष आणि नवीन पुस्तक, आणि पुस्तकातले प्रत्येक पान म्हणजे आपला रोजचा दिवस. पुस्तकातल प्रत्येक एक प...