Wednesday, February 23, 2022

नाणं...

      11 वाजायला अवघ्या 20 मिनिटांचा कालावधी राहिलेला तोवर अनाउन्समेंट झाली आज गाडी 2 तास उशीरा चालेल. हे ऐकल्यावरच कपाळावर आठ्या आणून तो हताश झाला. अर्थात तो पाश्चिम महाराष्ट्रतल्या मोठ्या रेल्वे स्टेशनवर आपल्या गाडीची वाट पहात बसला होता. गाडी लेट आहे समजल्यावर थोडा टाइमपास म्हणुन आपल्या जागेवरून तो उठला...

     फलाटावरून त्याच्या येरझारया चालू होत्या. तशी स्टेशनवर जेमतेम गर्दी होती, कोरोना मुळे असेल कदाचित ,रोजच्या सारखी रेलचेल अजूनही चालू झाली नव्हती. प्रत्येकाच्या पेहरावावरुन वेगवेगळ्या  परराज्यातील मानस दिसत होती. कोण मराठी, कोण कन्नड, तामिळ, हिंदी असा बोलत होता. म्हणतात ना भारतात प्रत्येक कोसा दीड-कोसाला माणसाची भाषा आणि वेषभूषा बदलते याच उत्तर उदाहरण म्हणून समजा.

     थोड लांब चालत गेल्यावर फलाट बदलायच्या शिडीच्या शेजारी एक मुलगा तसा काही फार मोठा नव्हता ,जेमतेम 10-12 ला असेल कदाचित , बूट पॉलिश करत बसला होता. याच्या पायातील बूट पाहून त्याने विचारले 'साहेब बूट पॉलिश करायचे का..? यावर त्याने प्रथमतः नकार दर्शवला पण त्याच फलाटावरून परत येताना त्याने आपला रोख त्याच्याकडे वळवला.

     याने स्वताचे बूट पॉलिश करून घेतले, पॉलिश केल्यावर बूट चमकू लागले होते. सेम आहे बर का... आपल्याला पण चमकायचे असेल तर कायम अपडेट राहील पाहिजे. असो, पैसे विचारताच त्याने 20 सांगितले तसे याने 10-10 रुपयाचे दोन नाणे खिशातून काढले आणि त्याला देणार तोवर त्याच्या हातून एक नाणे खाली पडले....त्यावर तो मुलगा काही फिल्मी अंदाजात म्हणाला "गीरे हुये पैसे में नही उठाता" म्हणजे ते दीवार पिक्चर मध्ये अमिताभ सर करतात ना तसे.

     यावर हा....अरे तुम्ही लोक पण ना,पिक्चर बघून बघून जगता वास्तवात तस काहीही नसत. तू म्हणतोस त्या पिक्चर मध्ये नंतर अमिताभ खूप मोठे होतात ते ही वाईट, चुकीच्या मार्गाने. तू सुद्धा अशीच स्वप्नं बघतोयस का...? याने आपले तत्त्वज्ञान पाजळायची संधी नाही सोडली.

     अरे साहेब माहीत आहे मला तो मुलगा बोलू लागला.. पिक्चर खरे नसतात म्हणून तर बागबान मधल्या अमिताभ सारख कोणी दत्तक घेईल म्हणून वाट न बघता मेहनत करतोय. सबंध दिवसात ईतक कमावतो की त्यामुळे माझ्या आईला दुसरीकडे कोणत काम कराव लागत नाही. त्याचबरोबर ओपन कॉलेज मधून बारावी सुद्धा करतो आहे.

     हे ऐकत असतानाच खाली पडलेल नाणे याने अलगद उचलून त्याच्या हातावर ठेवत हा म्हणाला...मला माहिती आहे तू जीवनात खूप प्रगती करशील कारण तुझ्याजवळ आई आहे आणि जिद्दही.....



-सुदन जाधव 

1 comment:

सरत्या वर्षाला निरोप देताना...

      ए क वर्ष एका पुस्तका सारख असतं. नवीन वर्ष आणि नवीन पुस्तक, आणि पुस्तकातले प्रत्येक पान म्हणजे आपला रोजचा दिवस. पुस्तकातल प्रत्येक एक प...