Thursday, July 22, 2021

सावध व्हा...

     पाठीमागे वळून जर गेल्या काही दशकांचा शेअर बाजाराचा आलेख पाहिला तर तो चढत्या क्रमानेच दिसेल म्हणजे आलेख हा वाढता आहे ही झाली इन्व्हेस्टमेंट लोकांसाठी आनंदाची गोष्ट पण काही आलेख असे देखील आहेत जे चिंतेत टाकणारे आहेत. एक आलेख तापमान वाढ आणि पर्यावरण समतोल दिवसेंदिवस बिघडतोय याचा आलेख ही चढता आहे.


   मी आज बोलतोय ते पर्यावरण आणि हवामानात होणार्‍या बदला बद्दल. खरच की मी तर शालेय जीवनात असताना पाठ्यपुस्तकांत वाचतोय भारतात 3 ऋतू आहेत.उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा. आणि त्यांचा कालावधी ही ठरलेला असायचा.

   पण गेल्या काही वर्षामध्ये मला नाही वाटत की हे ऋतू आपल्या ठरल्या वेळेप्रमाणे चालत आहेत. उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात पाऊस लांबणीवर आणि चालू झाला की महापूराशिवाय पाऊस थांबायचं नाव घेत नाही. सकाळी थंडी,दुपारी अंग करपेल अस ऊन आणि रात्री पाऊस.  कस शरीर साथ देणार... 40- 50 हजाराचा ए.सी. फिका पडतो एका खोलीमधील तापमान मेंटेन करायला मग 50-60 वर्षाच शरीर काय टिकेल अशा वातावरणात, टिकाव धरू शकेल...?

   आज लिहण्याची इच्छा नव्हती पण ...  परिस्थिती समोर परत एकदा मानव हतबल होताना दिसत आहे.  आता कुठे कोरोना मधून आपण सावरतोय त्यात जून मध्ये पावसाने दडी मारलेली पण गेल्या 4-5 दिवसात जो आभाळ फाटल्यागत कोसळतोय तो काही थांबायचं नाव घेत नाही. 





कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-4

पुनः एकदा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही गाव- शहरे अगोदरच पाण्याखाली गेली आहेत. एकंदरीत सध्या भयावह परिस्थिती आहे महाराष्ट्रात.

एकंदरीत पर्यावरणाचा समतोल वैगेरे वाचविण्याच्या पलीकडे आपण केव्हाच गेलोय...आता पुढे स्वतःलाच वाचवायची धडपड तर उरणार नाही ना...?


अनुत्तरीत...😔



-सुदन जाधव






Wednesday, July 21, 2021

शाळा आणि कोरोना

 शाळेत गेल्यावर चित्र काही वेगळच असत ना...प्रत्येकजण आपल्या मर्जीने काम करत असतो. कोणी झाडू मारतय,कोणी झाडांना पाणी घालतो आहे, कचरा वेचनारे, काही मुख्य फळ्यावर आजचा सुविचार आणि दिनविशेष लिहिण्यात मग्न तर काहीजण आपल्या खेळाच्या नादात...


कधीकधी शाळांचा खूप कंटाळा येतो. सतत अभ्यास करावा लागतो. एकाच वर्ग खोलीत बसून राहावे लागते. हवे तेव्हा हवे ते करता येत नाही. गृहपाठ केला नाही तर शिक्षा होते. जरा चूक झाली की बाई आमच्या आई-बाबांना बोलावतात. परीक्षेत नापास झाल्यावर खूप दुःख होते. म्हणून वाटते की शाळा बंद झाल्या तर खूप बरे होईल हा सगळा त्रास वाचेल. मात्र शाळा बंद झाल्या तर खूप नुकसान होईल. शाळेमुळे मित्र मिळतात.

कोरोनाच्या परिस्थितीत शाळा संपूर्णपणे बंद झाल्या....

 *सवेरे सवेरे, यारों से मिलने, बन ठन के निकले हम

सवेरे सवेरे, यारों से मिलने, घर से दूर चले हम

रोके से ना रुके हम , मर्ज़ी से चलें हम

बादल सा गरजें हम , सावन सा बरसे हम

सूरज सा चमके हम - स्कूल चलें हम* 

त्यामुळेच रोजचा रस्त्यात होणारा मुला- मुलींची चा किलबिलाट हा शुकशुकाट मध्ये बदलून गेला...गेली दोन वर्ष झाले शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट नाही ना काही. काही विद्यार्थ्यानी शाळेचे तोंड सुद्धा न पाहता वरच्या वर्गात गेली. वरच्या वर्गात गेल्यावर होणारी वह्या- पुस्तकांसाठी खरेदी साठी भयाण शांतता दिसते....



प्रत्येक शाळेचा गणवेश आणि त्याप्रमाणे त्यांची ओळख.... शाळा म्हंटलं की आठवते ती शाळेची प्रार्थना आणि राष्ट्रगीत.... मला आजही आठवत ते एका सुरात गायलेले राष्ट्रगीत ....आठवले तर आजही डोळ्यात पाणी येत....कुठे गेले ते दिवस? 
किती दिवस झाले शाळेची घंटा ऐकून...मुलांचा शाळेत मित्रासोबतचा खेळ, सलग तासाचा कंटाळा, गणिताचं भय, मराठीची अभंगवाणी, विज्ञान आणि रासायनिक क्रिया,चित्रकलेचा थाट, मजेचा ऑफ तास, एकमताने घेतलेला PE चा तास, त्यात सेक्रेटरीने केलेली तक्रार आणि खाल्लेला मार,दुपारच्या सुट्टीत एकत्र खाल्लेला डबा...सर्वकाही थांबल.
      शाळेचे वर्गही  मुलांना शोधत असतील का हो? मग तो हुशार असो किंवा नसो....प्रत्येक विद्यार्थी हा शाळेचा लाडकाच की!
पॉकेट मनी मधून शाळेसमोर विकायला येणारे पेरू, चॉकलेट, बोरकुट, चिंच इत्यादी. म्हणजेच शालेय जीवमधील स्नॅक्स आणि त्यांच्यावरच विक्रेत्यांचे चालणारे कुटुंब  सगळ बंद झाल...आता कस उदरनिर्वाह करत असतील ते?

    कोरोनाच्या परिस्थितीत शाळा संपूर्णपणे बंद झाल्या. मात्र, विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करिता ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु झाले. पण ग्रामीण भागातील विद्यार्थांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी कुठलेही साधन नव्हते. त्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॅाप अथवा टॅब हे तर दूरचंच…. काही गावांमध्ये तर मोबाईलला रेंज देखील नाही. अशा सर्व परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे ऑनलाईन शिक्षण घेतले असेल याची कल्पना आपल्याला करता येईल. मात्र, दुसरीकडे शहरी भागातील विद्यार्थ्यांनाकडे सोईसुविधा असल्यामुळे त्यांचे ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे सुरु होते. याच काळात ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये एक पुसटशी रेषा निर्माण झाली आहे.
    
 कोरोनावर मात करुन आपण शाळा पुन्हा एकदा सुरु केल्या आहेत हा आनंद व्यक्त करणे चुकीचे ठरेल कारण जरी शाळा सुरु झाल्या असतील तरी अनेक मोठ्या समस्या आपल्या पुढे उभ्या आहेत. कारण अजूनही कोरोनाचे संकट गेले नाही. शाळांमधून कोरोनाचा प्रसार होणार नाही, याकडे लक्ष देणे सर्वात महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था कशी आहे, त्यांचा जो वेळ व्यर्थ केली त्याची भरपाई कशी करता येईल, यावर विचार करण्याची गरज आहे.



-सुदन जाधव 


Wednesday, June 30, 2021

स्टोव्ह...

    पूर्वी चुलीवर स्वयंपाक होत. पाणी तापवण्यासाठी बंब असायचे. वीज गेली तर रॉकेलची चिमणी, कंदील पेटवत. कालांतराने लाकडाच्या चुलीची जागा रॉकेलच्या स्टोव्हने, पाणी तापवण्याच्या बंबाची जागा वॉटर हिटर, गिझरने तर चिमणी, कंदीलची जागा चार्जेबल बॅटऱ्यांनी घेतली. श्रीमंतांच्या घरी व मोठ्या हॉटेलांत दिसणारी गॅस शेगडी सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आली तेव्हापासूनच स्टोव्ह बाजूला सारले जात होते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून सर्वसामान्यांच्या घरांमध्ये गॅस शेगडी पोचली आहे; मात्र, सिलिंडरचे दर गरिबांच्या आवाक्‍यात नसल्याने रॉकेलच्या स्टोव्हचा वापर आजही काही प्रमाणात होत आहे.

स्टोव्ह चा वापर - 
    स्टोव्ह च्या टाकीमध्ये रॉकेल भरताना गाळण म्हणून सुती कापड अथवा नळकांडे म्हणजेच काहीजण त्याला नाळक म्हणतात ते वापरायचे. हवा भरण्यासाठी लहान हातपंप असायचा दाभना सारखिच लहान सळी आणि त्याला पुढे चामड्याचे वाशर असायची आणि वापरायच्या आधी गोडेतेल मध्ये भिजवून वापरावी लागे ,म्हणजेच Air प्रेशर पंप जितका चांगला असायचा तितकाच स्टोव्ह ची आग आपण सहजरीत्या वाढवू शकत होतो. 
सुरू झाला की फर्ररऽऽ असा आवाज करायचा. 


    कधी कधी काजळी मुळे स्टोव्ह कमी पेटायचा तर तो ब्लॉकेज काढायला एक पिन असायची. जो नोजल साफ करायचा टोचण देऊन.आगीचा झोत कमी करण्यासाठी एक चावी असायची जी सुलट् फिरवून मोकळी करायची म्हणजे Air प्रेशर कमी होऊन आगीचा झोत कमी व्हायचा.
     स्टोव्ह दुरुस्तीच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. सॉल्डरिंग, बर्नर बदलणे व साफ करणे, वायसर बदलणे अशा कामांचे रोजचे 200 ते 300 रुपये मिळत होते. आता दिवसभर दुरुस्तीचे कामच नाही. गॅस शेगडीला मेंटेनन्सची जास्त गरज नसल्याने ती कामे अपवादाने मिळतात.
    गरिबांना सिलिंडरची किंमत एकरकमी 800 रुपये परवडत नाही. एक लिटर रॉकेल तीन-चार दिवस पुरते. रॉकेल पुन्हा चालू केल्यास स्टोव्हची विक्री वाढू शकेल.



-सुदन जाधव 


Thursday, May 13, 2021

कविता ....असे करावेच लागते👍

 

"जीवनाचा प्रवास आखल्या रेघेने होत नाही, नागमोडी वळणे ही घ्यावीच लागतात."👣


"सत्य कितिही कटू असले तरी,प्रसंगी ते पचवावेच लागते."🗣


"आज ती कळी असली तरी, तिला उद्या फुल व्हावेच लागते."🌹


"फुल कितिही सुंदर असले तरी, त्याला उद्या मिटावेच लागते."🥀


"माणुस कितिही पुढे गेला तरी, मागे सावलीला न्ह्यावेच लागते."🐾


"पोटभर भाकरी खाल्ली तरी,वर थोडे पाणी प्यावेच लागते."🥛


"लेक कितिही लाडकी असली तरी,तिला सासरी जावेच लागते."👸


"जग कितिही सुंदर असले तरी, ते एकदा सोडून जावेच लागते."🙏🙏🙏



-सुदन जाधव

Sunday, May 9, 2021

आरोग्य सेतू (Aarogya Setu) वरून लशीसाठी नोंदणी कशी करायची?

 भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, 1 मे 2021 पासून 18 वर्षे वयाच्या वरील सर्वांचं लसीकरण सुरू झालेलं आहे. अनेक राज्यांमध्ये लशींच्या उपलब्धतेनुसार 18-44 वयोगटाचं लसीकरण करण्यात येतंय.

लसीकरणासाठीची नोंदणी भारत सरकारच्या आरोग्यसेतू app वरून करता येत आहे. नोंदणी कशी करायची ते पाहुया.

सर्वात आधी आरोग्य सेतू app डाऊनलोड करा. हे app सुरू केल्यानंतर होम पेजला उजव्या कोपऱ्यात कोविनसाठीचा लोगो आहे यामध्ये वॅक्सिन इन्फोर्मेशन म्हणजे लशींबद्दलची माहिती, वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण, वॅक्सिनेशन सर्टिफिकेट आणि वॅक्सिनेशन डॅशबोर्ड म्हणजे आकडेवारी असे पर्याय आहेत. यातल्या वॅक्सिनेशनवर क्लिक करा.



तुमचा मोबाईल नंबर टाकून क्लिक करा. OTP आल्यानंतर तो भरा


यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव, लिंग, जन्म वर्ष, फोटो आयडीचे तपशील भरावे लागतील. एका मोबाईल नंबरवर 4 जणांची नोंदणी करता येईल.

नोंदणी केल्यावर तुम्हाला त्याविषयीचा एसएमएस येईल.

यानंतर शेड्यूल अपॉइंटमेंट पर्यायावर क्लिक करून पिन कोड टाकून तुम्हाला लसीकरण केंद्र आणि उपलब्ध स्लॉट शोधता येईल. यामध्ये तुम्हाला मोफत लस देणारी केंद्र आणि पैसे भरून लस घेता येणारी केंद्र यातला पर्याय निवडता येईल.

नोंदणीसाठी कोणती कागदपत्रं लागतील?

नोंदणी करण्यासाठी फोटो असणारं ओळखपत्रं असणं आवश्यक असेल. स्वतःची नोंदणी करताना इलेक्ट्रॉनिक KYC साठी ओळखपत्रं स्कॅन करून जोडावं लागेल. यासाठी 12 ओळखपत्रांचा पर्याय देण्यात आलेला आहे.

ही कागदपत्रं वापरता येतील -

मतदार ओळखपत्र

आधार कार्ड

ड्रायव्हिंग लायसन्स

पॅन कार्ड

मनरेगा रोजगार कार्ड

बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक

पासबुक

पेन्शनची कागदपत्रं

नोंदणी करताना जे ओळखपत्रं वापरण्यात आलेलं आहे, तेच ओळखपत्र लस घेण्यासाठी जाताना दाखवावं लागेल. त्यावेळी इतर ओळखपत्रं वापरता येणार नाहीत.

...धन्यवाद


-सुदन जाधव



Monday, May 3, 2021

इंजीनियरिंग पुस्तके

 नमस्कार ....

सर्वजण आपली तसेच आपल्या कुटुंबाची  काळजी घेतच असतील असे समजतो.

कोरोना आला आणि आपण खुप काही गमावलो किंबहूना गमावतो आहे. पण अस म्हणायलाही काही हरकत नाही की कोरोना खुप काही शिकवायला देखील आलाय.

मागच्या आठवड्यात असाच गावी गेलेलो. शनिवार गेला आणि रविवारी मोकळा वेळ होता पण कोरोनामुळे कुठे बाहेर अथवा क्रिकेट खेळायला ग्राउंड वर सुद्धा जाता येत नव्हते. मग असाच टीवी पाहत बसलो होतो,पण मैच शिवाय मी जास्त टीवी बघत नाही म्हणून उठुन झोपायच म्हणून जात होतो तर घरातील पोट माळ्यावर मोठी पोती ठेवलेली दिसली, विचारल्यावर समजल की त्या पोत्यात वेगळ काही नसुन माझी आणि मोठ्या भावाची इंजीनियरिंग ची पुस्तके आहेत.

....म्हणालो बघुया तरी परत कॉलेज दुनियेत जाऊन. शोधत असता त्या पोत्यात प्रैक्टिकल बुक,इंजीनियरिंग ड्रॉइंग,C++,जर्नल, रेफरंस बुक ,कैलक्युलेटर ड्राफ्टर ईत्यादी मिळाले. 

तरी रेफरंस पुस्तके आणि इतर इंजीनियरिंग पुस्तकांची यादी मी तयार केली आहे आणि ती खाली मी शेयर करतोच. ज्यावेळी इंजीनियरिंग पुर्ण झाले त्यावेळीच मी आणि माझा भावाने ठरवले होते की इन फ्यूचर आपण ही पुस्तके कोणाला लागणार असतील त्याना असच देऊया म्हणूनच अत्तापर्यंत ती व्यवस्तीत ठेवली गेली होती. तर ज्याना पुस्तके हवी असतील त्यानी मला डायरेक्ट कॉन्टैक्ट करु शकता. 

(किंमत - विनामूल्य)

पुस्तकांची यादी-

1. Fluid Mechanics and Hydraulic Machine (R.K.Rajput)


2. Mechanical System Design (Tech Max- R.B.Patil)


3. Modern Engineering Physics(A.S Vasudeva)


4.Computer Science with C++ (Sarswati publications)


5.Computer Integrated Manufacturing (Atish S. Chavan)


6.Automobile Engineering (Kirpal Singh)


7.Industrial Management and Operational Research (Nandkumar K.Hukeri)


8. Statistical Quality Control (M.Mahajan- Dhanpat Rai and co.)


9.Refrigeration and Air conditioning (Tech Max- U.H. Sakhalkar)


10.Industrial Fluid Power(Tech Max- Ashok Kumar)


11. Engineering Graphics (Agraval Prakashan)


12. Engineering Mathematics -2 (G.V kumbhojkar)


13. Computer Integrated Manufacturing (R.B.Patil)


14. Metrology and Quality Control(Tech Max- S.B Ingole)


15. Engineering Physics(Mahalaxmi - V.S.Karande)


16.Internal Combustion Engine(Tech Max- B.L.Singhal)


17.Induatrial Management and Opertaional Research (Mahalaxmi- P.G.Deshpande)


18.MBA- CET

Chandresh Agrawals


19. एकनाथ पाटिल (तात्या)

तात्यांचा ठोकला 

पुर्व परिक्षा मार्गदर्शक (PSI/STI)


-सुदन जाधव

शिक्षण- इंजीनियरिंग (यांत्रिकी)

संपर्क क्रमांक - 8308673878

Saturday, April 17, 2021

वॉट्सएप्प मैसेज -लिंकवर क्लिक करू नका

   नमस्कार ......कसे आहात? बरेच असाल असे समजतो. सर्वजन स्वत:ची तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घेतच असाल. चला ऐकुन बर वाटल. नाहितर कोरोनाचा अजुन काय पाय निघेना भारतातून त्यामुळे कीत्तेक राज्यात लॉकडाउन जाहिर केलेला आहे. अशातच वॉट्सएप्प वर आज काही मैसेज लिंक सोबत आले होते. तसे ते साधे मैसेज होते ...म्हणजेच Amazon prime,live stream,Online movie,Netflix free असे टैग असणारे आणि खाली त्यांची लिंक.

 तूम्हि म्हणाल की यात काय नविन म्हणून ...तर मित्रानो यापैकी कोणताही मैसेज तुम्हाला आला तर त्यावरील लिंक वर क्लिक करु नका. 

कारण-

ज्यानी ज्यानी त्या लीन्कवर क्लिक केलेत त्याच्या मोबाइल मध3 औटो ऐप्प डाउनलोड होतो अणि त्यांचे औटो मैसेज जेनरेट होतात. आणि जर कोणीही मैसेज सेंड केला आणि तो त्याना पोहोचला तर त्यांचा औटो रिप्लाई येतो त्या सबंधीत ग्रुप और पर्सनल व्यक्तीला आणि तो मैसेज दुसरा तिसरा कोणताही नसुन ती लिंकच त्याना औटो फॉरवर्ड होते.

त्यामुळे आपणाला कोणाचाही मैसेज आला तरी त्याला तुमच्याकडून लिंक आणि लिंकच फ़ॉरवर्ड होईल. आणि ज्याला तुमचा मैसेज गेलाय त्या व्यक्तीने जर त्या लिंकवर क्लिक केले तर त्यालाही तुमच्यासारखाच प्रॉब्लेंम चालू होईल. आता हा व्हायरस आहे की वॉट्सएप्प हैक माहित नाही पण सायबर पोलिसांनी याची दखल घेत तसा सुरक्षतेतसाठी खालील पोस्टर जाहिर केले आहे.


 ऐप्लिकेशन मधे जाऊन -त्या त्या ऐप्लिकेशन ला force stop करुन त्याचा data delete करा.


-सुदन जाधव

Tuesday, April 13, 2021

कोरोना दुसरी लाट-महाराष्ट्र लॉकडाउन 2.0

 नमस्कार ...आज गुढीपाडवा त्यानिमित्ताने सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा. गतवर्षी कोरोना विषाणू प्रार्दुभावामूळे कित्तेक कुटुंबाणी गुढीपाडवा सण साजरा केला नव्हता. आणि ज्यांनी साजरा केला असेल त्यांनी देवाकडे हेच साकडे घातले असेल की पुढच्या वर्षी गुढीपाडवा कोरोणामुक्तीनिशी साजरा होऊदे.

पण कल किसने देखा ...गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील कोरोना रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसतेय. त्यात महाराष्ट्रा  सोबत देशातील इतर राज्येदेखील कोरोना उद्रेक रूग्णसंखेत खराब यादीमधे होतीच पण यावर्षी मात्र महाराष्ट्राचा आकडा काही खाली उतरताना दिसत नाही याउलट रूग्णसंख्या झपाट्याने वाढ़ताना दिसत आहे. 


   महाराष्ट्रात सगळीकडे कोरोनाने रौद्र रुप धारण केलेले दिसत आहे. त्यात आपण ऐकत आहोच कुठे बेड तर कुठे ऑक्सिजन अभावी कितितरी रूग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत तर कित्तेक लोक दिवसाकाठी मृत्युला कवटाळत आहेत.

एकंदरीत कोरोनाने महाराष्ट्राची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळेच परत एकदा महाराष्ट्र सरकारने कोरोनाची साखळी तोडायला "ब्रेक दी चेन" संकल्पना आणत महाराष्ट्रात कडक लॉकडाउन आज जाहिर केला आहे.

आजच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी याबद्दल फेसबुक लाइव द्वारे याची माहिती दिली. पुढील 15 दिवस राज्यात संचारबंदी लागू राहिल अशी त्यावेळी त्यांनी माहिती दिली.

आता उरला प्रश्न तो या संचारबंदी दरम्यान काय चालू राहनार आणि काय बंद.....?

काय सुरु....?

या संचारबंदी दरम्यान रेल्वे,लोकल, बस सेवा,खत दुकाने,शीतगृहे,शेतीकामे औधोगिक क्षेत्रातील उधोगधंदे,पार्सल सेवा,बँका ,दूरसंचार,पेट्रोल पंप,कार्गो सेवा,मेडिकल आणि किराणा दुकाने इत्यादी चालू राहतील.

काय बंद....?

होटेल, रेस्टोरंट,बार ,चित्रपटघृह,शुटिंग आणि अनावश्यक फिरता येणार नाही.

हे असतानाच सरकारने एक महिना मोफत मिळनार याची घोषणा केली आहे. त्या खलील प्रमाणे...

शिवभोजन थाळी,परवानाधारक फेरीवाले,रिक्षावाले याना पांधराशे रूपये,7 कोटी लोकांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मिळेल.

तरी सर्वानी आपली तसेच आपल्या कुटुंबातील सर्वांची काळजी घ्यावी ही विनंती.

ही वेळ देखील निघुन जाईल.....🙏🙏🙏




-सुदन जाधव 

Thursday, April 8, 2021

कळतय पण वळत नाही....

    प्रत्येक देश हा आपल्या संस्कृती आणि सभ्यता यामुळे ओळखला जातो. त्याच प्रमाणे भारत देश हा सत्य, प्रामाणिकपणा, धार्मिकता, नैतिक मूल्ये आणि मानवतावादी या सर्वांमुळे जगप्रसिद्ध आहे.

परंतु आज भारत देशाला भ्रष्टाचार सारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भ्रष्टाचार हा संपूर्ण जगाला आणि देशाला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज बऱ्याच विकसित आणि विकसनशील देशांनी प्रगती केली आहे आणि करीतही आहेत.परंतु आजही कुठे ना कुठे तरी भ्रष्टाचार हा दिसून येतोच. भारताला काही वर्षांपूर्वी "सोनेकी चिडीया" अस संबोधलं जात होत पण आज याच भारतात भ्रष्टाचार आपली मूळ रोवून उभा आहे. आज भारत देशात अनेक लोक हे भ्रष्टाचारी बनले आहेत. भ्रष्टाचार हा देशाला किंवा समाजाला लागलेला एक मोठा कलंक आहे.


   आपण रोज टीवीवर पाहतो,आज याची चोकशी होणार तर उद्या त्याची. आणि एकदाची का चौकशी सुरु झाली की तो त्याच नाव घेतो आणि हा त्याच. पण की काय म्हणतो...भाडखाऊ ,आता एकमेकांची नाव घेताय पण मलाई खाताना जनाची नाहितर मनाची तर लाज वाटत नव्हती का? आणि आता नाव घेतोयस म्हणजे तुझा हप्ता थांबला म्हण की....🤣🤣🤣

आता भ्रष्टाचार म्हणजे काय...?

भ्रष्टाचार हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे – भ्रष्ट + आचार. भ्रष्ट म्हणजे वाईट आणि आचार म्हणजे आचरण. जे असे आचरण असते जे नेत्यानी प्रकारचे अनैतिक आणि अयोग्य असते.

जेव्हा एखादी व्यक्ती न्याय व्यवस्थेच्या स्वीकारलेल्या नियमांच्या विरोधात जाऊन स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जे चुकीचे आचरण स्वीकारते त्याला भ्रष्टाचार असे म्हटले जाते.आताची सरकारी बांधकामं पाहिली तर अस वाटतय की, बांधकाम निधीमधला 5% जरी खर्च केला असता तरी शाबाशकीच प्रमाणपत्र मिळेल तुम्हाला जनतेकडून. 

अहो उगीचच आपल्या पुर्वज्यानी बांधलेल्या इमारती अजुन दिमाखात उभ्या नाहित. फक्त सिमेंट मधे जान असुन काही फायदा नसतो साहेब, तेवढ इमान पहिजे की काम करणारयामध्ये.


आणि बांधकामाची शाश्वती कधीपर्यंत ...? जोपर्यंत चंद्र- सुर्य आणि पृथ्वी आहे तोपर्यंत... कळालच असेल मी कुणाबद्दल बोलतोय ते, स्वतची जमीन-लत्ता विकून आपल कार्य पुर्ण करणारे कुठे आणि आहे त्यातले तुझी टक्केवारी इतकी आणि माझी इतकी म्हणणारे आत्ताचे बोके कुठे.... नेता नेक होता त्यांचा🚩🚩🚩

भ्रष्टाचाराची कारणे काय असतील ....?

आपल्या भारत देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त आहे.

नोकरीचा अभाव,शिक्षणाचा अभाव,लोभ आणि असमानता,असमानतेमुळे, आर्थिक आणि सामाजिक स्थितीमुळे एखादा व्यक्ती हा भ्रष्टाचारी बनतो. आज माणसाच्या मनात स्वार्थीपणा हा वाढला आहे.

काही लोक हे इतके स्वार्थी झाले आहेत कि, त्यांना आपल्या नातेवाईकां आणि मित्रांपेक्षा जास्त पैसे कमवायचे असतात. म्हणून ते आपला स्वार्थ किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचार या मार्गाचा अवलंब करतात.


भ्रष्टाचार हा एक संसर्गजन्य रोगासारखा आहे. जर हा एखाद्या देशाला किंवा समाजाला लागला तर त्या देशाचे आणि समाजाचे संपूर्ण जीवन नष्ट करू शकतो.

भ्रष्टाचाराला रोकण्यासाठी समाजातील विविध स्तरांवर कडक कारवाई केली पाहिजे. तसेच सरकारने देशातील प्रत्येक बेरोजगार लोकांना रोजगार प्राप्त, शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

त्याच प्रमाणे देशात काळा पैसा वापरणाऱ्या लोकांवर कठोर कायदे केले पाहिजेत. जो पर्यंत हे थांबणार नाही तो पर्यंत देशातील प्रत्येक व्यक्ती आपली सामाजिक जबाबदारी उचलणार नाही.


-सुदन जाधव.

Sunday, April 4, 2021

गुढीपाडवा, छत्रपती संभाजीराजेंचे बलिदान आणि समज-गैरसमज...

    शाळा,कॉलेज म्हणलं की मित्र- मैत्रिणी आल्याच त्यासोबत त्यांच्या गप्पा गोष्टी ... अशीच काही मुलींमधे गप्पा रंगल्या होत्या. त्यातच एकटी बोलली अगं आपला गुढीपाडवा सण  जवळ येतोय काय काय करायच ठरवलेस तू. त्यावर उत्तर म्हणून दुसरी बोलली मी त्यादिवशी साडी आईची साडी नेसणार. आणि कानामधे नविन रिंग घालणार. तोवर पहिलीच रिप्लाई अगं अगं तुझीतर जोरदार तयारी दिसतेय मलापण खरेदीला जायच आहे. मी पण नविन मोत्याची माळ घेणार आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर.....असच गप्पा चालू असताना त्यांचा मित्र तिथ येतो.


ये हाय, वॉट्सएप्प गाइज़ ....सगळे हाय हाय करतात. बोलतो काय गप्पा रंगलेत आणि काय ग काय खरेदी करणार बोलत होतीस...?

त्यावर ...अरे आपला गुढीपाडव्याचा सण येतोय ना मग तेच बोलत होतो आम्ही. गुढी उभा करनार,तोरण बांधायच ,न्यू साडी,मोत्याची माळ....तो बोलला म्हणजे तुम्ही गुढी उभी करता ...? अरे म्हणजे इतिहास माहित नाही तुम्हाला, ज्या दिवशी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे हाल- हाल करुन त्याना मारले आणि त्याचाच आनंद म्हणून महाराजांच्या विरोधकांनी दारात गुढ्या उभ्या केल्या.

सर्वानी यावर होकारार्थी मान हलविल्या आणि बोलले होय खरय हे....आम्ही वाचलोय हे वॉट्सएप्प वरती ...त्यामुळे आम्ही भगवे ध्वज लावतो....बरोबर आहे यांच ....सोशल मिडियावर जे येत ते वाचतात आणि खर समजतात. ना त्याला एतिहास ना सबुत.

आपल्या हिंदु धर्मामध्ये जे सण सांगितलेले आहेत ते एवढे अलिकडच्या काळातील किवा त्याला इतिहासाची जोड नसलेले थोडीच आहेत. आणि आपण म्हणतो ना भगवा ही आपली शान आहे. हो भगवा ही आपली शान आहेच आणि  वर्षातील 365 दिवस आपला भगवा आकाशात सन्मानाने फडकला पाहिजे.पण गुढिच्या जागी भगवा ही संकल्पनाच निव्वळ चुकिची आहे.

आणि राहिला तो विषय आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा ज्याणि इतिहास गाळुन गाळुन चार ओळींवर आणला ते काय इतिहास सांगणार आणि लिहिणार. आपण कित्तेक पुस्तके चाळलीत ना तर वेगवेगळा इतिहास तुम्हाला अनुभवायला मिळेल. पण हा इतिहास वाचलाच पहिजे. उगीचच स्वराज्य उभारल नाही गेल किवा कोणी भेट नाही दिली. ज्याच्या नावाने आजही अंगावर  शहारे येतात ते आपले  "छत्रपती शिवाजी महाराज" आणि याच नावाला पुढे कोणी की लावला तर नकळत पणे तोंडातून शब्द बाहेर येतील...जय.

संपुर्ण हिंदुस्तानाचे दैवत ...ते होते म्हणून आपले देव आज देवळात पहायला मिळतात.

हा आता गुढिचा संधर्भ कुठला असेल तर तो आपल्या प्रभू रामचंन्द्राचा रामायण. त्यात साफ उल्लेख आहे ज्यावेळी प्रभूनी रावणाचा वध केला आणि ते अयोध्येला परत आले त्यावेळी त्यांच्या विजयाचे प्रतिक म्हणून सगळ्या अयोध्यावासीयांनी सर्वांच्या घरावर गुढ्या उभ्या केल्या होत्या. मग आपणच विचार केला  रामायण आणि संभाजी महाराजांचा मृत्यू तर यामधे खुप वर्षांचा कालावधी आहे.

आपल्या नविन मराठी वर्षाची सुरुवात देखील याच दिवशी होते बर का....आता काहीजण बोलतील आपला तर 1जानेवारी ला असतो ना नविन वर्ष. खर बोलायच गेल तर नविन वर्षाची धम्माल सुरु होते ती 31 डिसेम्बर ला आणि ती कशानी दारू आणि नविन वर्षाचा पहिला दिवस आपला उजाडतो कधी तर दुसर्या दिवशी म्हणजेच 1जानेवारीला दुपारी 1-2 ला म्हणजेच दारू उतरेल तेव्हा.

पण याउलट पाहिलात तर ...ज्या दिवशी ब्रह्मदेवाने या पृथ्वीची निर्मिती केली, झाडांना नविन पालवी फुटते,ज्या दिवसाची सुरुवात चैतन्यमय अशा सूर्यदेवच्या दर्शनाने होते तो दिवस म्हणजे चैत्र शुध्द  प्रतिपदा अर्थात आपला गुढीपाडवा. आणी या सण महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतामधे हा सण वेगवेगळ्या नावाणी साजरे करतात.

वेगवेगळ्या राज्यात हा सण वेगवेगळ्या नावाणी साजरे करतात. आतातर विदेशी लोक आपली हिंदु संस्कृती विदेशात सुद्धा आत्मसात करायला लागलेत. 

मग चला यावर्षी सर्वानी आपल्या हिंदु नववर्षाचे जल्लोषात स्वागत गुढी उभा करुन करुयात. आणि भगवा ध्वज सुद्धा  फडकवूया.


पोस्ट द्वारे कुणाच्याही भावना दुखवायचा ऊद्देश नाही, तसे वाटल्यास क्षमस्व...



सुदन जाधव

सरत्या वर्षाला निरोप देताना...

      ए क वर्ष एका पुस्तका सारख असतं. नवीन वर्ष आणि नवीन पुस्तक, आणि पुस्तकातले प्रत्येक पान म्हणजे आपला रोजचा दिवस. पुस्तकातल प्रत्येक एक प...