पाठीमागे वळून जर गेल्या काही दशकांचा शेअर बाजाराचा आलेख पाहिला तर तो चढत्या क्रमानेच दिसेल म्हणजे आलेख हा वाढता आहे ही झाली इन्व्हेस्टमेंट लोकांसाठी आनंदाची गोष्ट पण काही आलेख असे देखील आहेत जे चिंतेत टाकणारे आहेत. एक आलेख तापमान वाढ आणि पर्यावरण समतोल दिवसेंदिवस बिघडतोय याचा आलेख ही चढता आहे.
मी आज बोलतोय ते पर्यावरण आणि हवामानात होणार्या बदला बद्दल. खरच की मी तर शालेय जीवनात असताना पाठ्यपुस्तकांत वाचतोय भारतात 3 ऋतू आहेत.उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा. आणि त्यांचा कालावधी ही ठरलेला असायचा.
पण गेल्या काही वर्षामध्ये मला नाही वाटत की हे ऋतू आपल्या ठरल्या वेळेप्रमाणे चालत आहेत. उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात पाऊस लांबणीवर आणि चालू झाला की महापूराशिवाय पाऊस थांबायचं नाव घेत नाही. सकाळी थंडी,दुपारी अंग करपेल अस ऊन आणि रात्री पाऊस. कस शरीर साथ देणार... 40- 50 हजाराचा ए.सी. फिका पडतो एका खोलीमधील तापमान मेंटेन करायला मग 50-60 वर्षाच शरीर काय टिकेल अशा वातावरणात, टिकाव धरू शकेल...?
आज लिहण्याची इच्छा नव्हती पण ... परिस्थिती समोर परत एकदा मानव हतबल होताना दिसत आहे. आता कुठे कोरोना मधून आपण सावरतोय त्यात जून मध्ये पावसाने दडी मारलेली पण गेल्या 4-5 दिवसात जो आभाळ फाटल्यागत कोसळतोय तो काही थांबायचं नाव घेत नाही.
कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-4
पुनः एकदा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही गाव- शहरे अगोदरच पाण्याखाली गेली आहेत. एकंदरीत सध्या भयावह परिस्थिती आहे महाराष्ट्रात.
एकंदरीत पर्यावरणाचा समतोल वैगेरे वाचविण्याच्या पलीकडे आपण केव्हाच गेलोय...आता पुढे स्वतःलाच वाचवायची धडपड तर उरणार नाही ना...?
अनुत्तरीत...😔
-सुदन जाधव
👍🏻👍🏻😥😥😥खुप मस्त सर
ReplyDeleteखूप मस्त
ReplyDelete😥😥😥🌧️🌧️
ReplyDelete