📱मोबाईलची बॅटरी लवकर उतरते?
विज्ञान शाप की वरदान म्हणून विचारलो तर काहीजण म्हणतील वरदानच की आणी काही बोलतील शाप(आजोबा-पणजोबा). मानवाने आपल्या बुद्धीचा व कल्पकतेचा वापर करुन खुप प्रगती केलीय. खुप अवघड गोष्टी सोप्या देखील केलेल्या आहेत. एका सेकंदात/मिनिटात माहिती, डाटा,देवाणघेवाण,संवाद किंवा आर्थिक व्यवहार करु शकतो. त्यासाठी कंप्यूटर ,लैपटॉप,टैबलेट,मोबाइल इ . यांच्या द्वारे आपण इंटरनेट वापरु शकतो....पण सगळ्यात सोयीस्कर असा ,सगळ्याना बिलगून असणारा असा लाडका आपला मोबाइल (मराठी मधे मोबाइल ला भ्रमणध्वनी म्हणतात).
📱मोबाइल चा प्रमुख वापर म्हणजे कॉल आणी मैसेज साठी होतो पण बैटरी खराब असेल तर ते ही काम होऊ शकत नाही....त्यात उन्हाळा सुरु झालय तसेच सर्वाना मोबाइल गरम आणी बॅटरी समस्या उध्भवत असतीलच म्हणून हा लेख लिहतोय ....
तूम्हाला तर माहीतच आहे की, मोबाइल ची बॅटरी दोन ते तीन वर्षे तरी टिकायला हवी (सर्वसाधरण )मात्र पाच ते सहा महिन्यांत बॅटरी कशी काय बरं खराब झाली?
बऱ्याचदा आपण मोबाईल विकत तर घेतो मात्र त्यामध्ये जे मॅन्युअल असते ते वाचत नाही, या माहिती पुस्तकेत संपूर्ण माहिती दिलेली असते. मात्र आपण चार्जिंग करताना ज्या चुका करतो त्यामुळे आपली बॅटरी लवकर उतरते व कधी कधी बॅटरी फुगते देखील, तर काही जणांचा मोबाईल गरम होतो, वापर करताना किंवा चार्जिंग करताना देखील गरम होतो. तर हे सुद्धा चार्जिंग करताना जी आपण चूक करतो त्यामुळेच होते. म्हणून आज मी अशा पाच गोष्टी सांगणार आहे की जर या पाच गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा मोबाईल चांगला राहील व तुमची बॅटरी देखील दीर्घकाळ टिकेल. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
1) पहिली गोष्ट म्हणजे, ज्यावेळी तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावता त्यावेळी तुमच्या मोबाईलच्या मागचे कव्हर काढून मोबाईल चार्जिंगला लावावा. तुम्हाला वाटेल असे का करायचे तर याचे कारण असे आहे की, हे जे कव्हर असते हे बॅटरीला मिळणारा हवेचा पुरवठा थांबवते, थोडक्यात बॅटरीला हवा मिळत नाही, आणि परिणामी मोबाईल गरम होऊ लागतो आणि ज्यावेळी मोबाईल गरम होतो त्यावेळी आपोआपच बॅटरीवरती त्याचा खूप निगेटिव्ह इफेक्ट् पडतो, ज्यामुळे बॅटरी लवकर खराब होते….
2) दुसरी गोष्ट, तुम्हाला कंपनीने जो चार्जर दिला आहे तोच चार्जर तुम्ही मोबाईल चार्ज करताना वापरा. तुम्ही जर कोणताही चार्जर वापरू लागलात, उदाहरणार्थ तुमचा जर Samsung चा मोबाईल असेल आणि त्याला चार्ज करायला Oppoचा चार्जर वापरत असाल तर त्यामुळे देखील तुमची बॅटरी लवकर खराब होते, कारण प्रत्येक कंपनीने त्यांच्या मोबाईलला त्यांच्या चार्जरचे MAH म्हणजेच किती अँपिअर करंट वापरायचा हे ठरलेले असते तर तोच चार्जर आपण वापरा.
3) तिसरी गोष्ट, मोबाईलला चार्जिंग करताना मोबाईल नेहमी switch off करावा, जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर कमीत कमी flight mode वर तरी ठेवावा. जर तुम्ही तसाच मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर त्यामुळे एक बाजूला चार्जिंग चालू राहते आणि दुसऱ्या बाजूला मोबाईलचे नेटवर्क चालू राहत, म्हणजे मोबाईल कामही करतोय आणि इकडे चार्जिंग देखील चालू आहे, थोडक्यात तुम्ही जॉबवर देखील गेलाय आणि काम करता करता जेवण पण करताय ,तर अशी परिस्थिती होते, त्यामुळे मोबाईल चार्जिंग होण्यास फक्त दीड ते दोन तास लागतात फक्त एवढाच वेळ तुम्ही तुमचा मोबाईल switch off करून ठेवा…
4) चौथी गोष्ट, आपली बॅटरी किती टक्के पर्यंत चार्ज करायची हे अनेकांना समजलेले नाही, त्यामुळे काही लोक 100 टक्के पर्यंत चार्ज करतात, आणि बरेच लोक असे आहेत की जे मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावतात…. कंपनीचे मॅन्युअल असे सांगते की, बॅटरी 90% ते 95% पर्यंत चार्जिंग करा, आणि 100 पर्यंत चार्जिंग करू नका. जे लोक हा नियम पळत माहीत त्यांचे मोबाईल लवकर खराब होतात व बॅटरी देखील फुगते आणि ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम 100 टक्के होतो…..
5) पाचवी गोष्ट, ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कंप्युटर्स वगैरे आहे, ते त्याला USB केबल जोडतात आणि मग त्याला मोबाईल 24 तास मोबाईल लावून ठेवतात. तुम्हाला सांगू इच्छिते की ,त्या USB मधून तुमच्या मोबाईलची चार्जिंग तर चालू असते मात्र त्याला जो करंट मिळतो, जे MAH मिळते ते अतिशय कमी मिळते, त्यामुळे मोबाईल खूप हळू चार्ज होतो त्यामुळे देखील मोबाईल खराब होतो करण USB केबलचे काम तुमच्या मोबाईल मधील डाटा कम्प्युटर मध्ये घेणे किंवा कम्प्युटर कडून घेणे हे आहे. म्हणून तुम्ही USB ने मोबाईल चार्जिंग कधीही लावू नये..
धन्यवाद....

Khre ahe sir
ReplyDeleteUseful information👍
ReplyDelete👍 उपयुक्त माहीती
ReplyDeleteखुपच छान माहिती लिहिली आहे सर खुपच मस्त 👌👌👍👍
ReplyDeleteVery useful information you have stated in very simple words 👍👍👍
ReplyDeleteGreat 👍
ReplyDeleteGreat 👍
ReplyDeleteSir very useful information thank you
ReplyDeleteSir very useful information thank you
ReplyDeleteSir very useful information thank you
ReplyDelete