Saturday, April 17, 2021

वॉट्सएप्प मैसेज -लिंकवर क्लिक करू नका

   मस्कार ......कसे आहात? बरेच असाल असे समजतो. सर्वजन स्वत:ची तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घेतच असाल. चला ऐकुन बर वाटल. नाहितर कोरोनाचा अजुन काय पाय निघेना भारतातून त्यामुळे कीत्तेक राज्यात लॉकडाउन जाहिर केलेला आहे. अशातच वॉट्सएप्प वर आज काही मैसेज लिंक सोबत आले होते. तसे ते साधे मैसेज होते ...म्हणजेच Amazon prime,live stream,Online movie,Netflix free असे टैग असणारे आणि खाली त्यांची लिंक.

 तूम्हि म्हणाल की यात काय नविन म्हणून ...तर मित्रानो यापैकी कोणताही मैसेज तुम्हाला आला तर त्यावरील लिंक वर क्लिक करु नका. 

कारण-

ज्यानी ज्यानी त्या लीन्कवर क्लिक केलेत त्याच्या मोबाइल मध3 औटो ऐप्प डाउनलोड होतो अणि त्यांचे औटो मैसेज जेनरेट होतात. आणि जर कोणीही मैसेज सेंड केला आणि तो त्याना पोहोचला तर त्यांचा औटो रिप्लाई येतो त्या सबंधीत ग्रुप और पर्सनल व्यक्तीला आणि तो मैसेज दुसरा तिसरा कोणताही नसुन ती लिंकच त्याना औटो फॉरवर्ड होते.

त्यामुळे आपणाला कोणाचाही मैसेज आला तरी त्याला तुमच्याकडून लिंक आणि लिंकच फ़ॉरवर्ड होईल. आणि ज्याला तुमचा मैसेज गेलाय त्या व्यक्तीने जर त्या लिंकवर क्लिक केले तर त्यालाही तुमच्यासारखाच प्रॉब्लेंम चालू होईल. आता हा व्हायरस आहे की वॉट्सएप्प हैक माहित नाही पण सायबर पोलिसांनी याची दखल घेत तसा सुरक्षतेतसाठी खालील पोस्टर जाहिर केले आहे.


 ऐप्लिकेशन मधे जाऊन -त्या त्या ऐप्लिकेशन ला force stop करुन त्याचा data delete करा.


-सुदन जाधव

Tuesday, April 13, 2021

कोरोना दुसरी लाट-महाराष्ट्र लॉकडाउन 2.0

 मस्कार ...आज गुढीपाडवा त्यानिमित्ताने सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा. गतवर्षी कोरोना विषाणू प्रार्दुभावामूळे कित्तेक कुटुंबाणी गुढीपाडवा सण साजरा केला नव्हता. आणि ज्यांनी साजरा केला असेल त्यांनी देवाकडे हेच साकडे घातले असेल की पुढच्या वर्षी गुढीपाडवा कोरोणामुक्तीनिशी साजरा होऊदे.

पण कल किसने देखा ...गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील कोरोना रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसतेय. त्यात महाराष्ट्रा  सोबत देशातील इतर राज्येदेखील कोरोना उद्रेक रूग्णसंखेत खराब यादीमधे होतीच पण यावर्षी मात्र महाराष्ट्राचा आकडा काही खाली उतरताना दिसत नाही याउलट रूग्णसंख्या झपाट्याने वाढ़ताना दिसत आहे. 


   महाराष्ट्रात सगळीकडे कोरोनाने रौद्र रुप धारण केलेले दिसत आहे. त्यात आपण ऐकत आहोच कुठे बेड तर कुठे ऑक्सिजन अभावी कितितरी रूग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत तर कित्तेक लोक दिवसाकाठी मृत्युला कवटाळत आहेत.

एकंदरीत कोरोनाने महाराष्ट्राची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळेच परत एकदा महाराष्ट्र सरकारने कोरोनाची साखळी तोडायला "ब्रेक दी चेन" संकल्पना आणत महाराष्ट्रात कडक लॉकडाउन आज जाहिर केला आहे.

आजच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी याबद्दल फेसबुक लाइव द्वारे याची माहिती दिली. पुढील 15 दिवस राज्यात संचारबंदी लागू राहिल अशी त्यावेळी त्यांनी माहिती दिली.

आता उरला प्रश्न तो या संचारबंदी दरम्यान काय चालू राहनार आणि काय बंद.....?

काय सुरु....?

या संचारबंदी दरम्यान रेल्वे,लोकल, बस सेवा,खत दुकाने,शीतगृहे,शेतीकामे औधोगिक क्षेत्रातील उधोगधंदे,पार्सल सेवा,बँका ,दूरसंचार,पेट्रोल पंप,कार्गो सेवा,मेडिकल आणि किराणा दुकाने इत्यादी चालू राहतील.

काय बंद....?

होटेल, रेस्टोरंट,बार ,चित्रपटघृह,शुटिंग आणि अनावश्यक फिरता येणार नाही.

हे असतानाच सरकारने एक महिना मोफत मिळनार याची घोषणा केली आहे. त्या खलील प्रमाणे...

शिवभोजन थाळी,परवानाधारक फेरीवाले,रिक्षावाले याना पांधराशे रूपये,7 कोटी लोकांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मिळेल.

तरी सर्वानी आपली तसेच आपल्या कुटुंबातील सर्वांची काळजी घ्यावी ही विनंती.

ही वेळ देखील निघुन जाईल.....🙏🙏🙏




-सुदन जाधव 

Thursday, April 8, 2021

कळतय पण वळत नाही....

    प्रत्येक देश हा आपल्या संस्कृती आणि सभ्यता यामुळे ओळखला जातो. त्याच प्रमाणे भारत देश हा सत्य, प्रामाणिकपणा, धार्मिकता, नैतिक मूल्ये आणि मानवतावादी या सर्वांमुळे जगप्रसिद्ध आहे.

परंतु आज भारत देशाला भ्रष्टाचार सारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भ्रष्टाचार हा संपूर्ण जगाला आणि देशाला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज बऱ्याच विकसित आणि विकसनशील देशांनी प्रगती केली आहे आणि करीतही आहेत.परंतु आजही कुठे ना कुठे तरी भ्रष्टाचार हा दिसून येतोच. भारताला काही वर्षांपूर्वी "सोनेकी चिडीया" अस संबोधलं जात होत पण आज याच भारतात भ्रष्टाचार आपली मूळ रोवून उभा आहे. आज भारत देशात अनेक लोक हे भ्रष्टाचारी बनले आहेत. भ्रष्टाचार हा देशाला किंवा समाजाला लागलेला एक मोठा कलंक आहे.


   आपण रोज टीवीवर पाहतो,आज याची चोकशी होणार तर उद्या त्याची. आणि एकदाची का चौकशी सुरु झाली की तो त्याच नाव घेतो आणि हा त्याच. पण की काय म्हणतो...भाडखाऊ ,आता एकमेकांची नाव घेताय पण मलाई खाताना जनाची नाहितर मनाची तर लाज वाटत नव्हती का? आणि आता नाव घेतोयस म्हणजे तुझा हप्ता थांबला म्हण की....🤣🤣🤣

आता भ्रष्टाचार म्हणजे काय...?

भ्रष्टाचार हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे – भ्रष्ट + आचार. भ्रष्ट म्हणजे वाईट आणि आचार म्हणजे आचरण. जे असे आचरण असते जे नेत्यानी प्रकारचे अनैतिक आणि अयोग्य असते.

जेव्हा एखादी व्यक्ती न्याय व्यवस्थेच्या स्वीकारलेल्या नियमांच्या विरोधात जाऊन स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जे चुकीचे आचरण स्वीकारते त्याला भ्रष्टाचार असे म्हटले जाते.आताची सरकारी बांधकामं पाहिली तर अस वाटतय की, बांधकाम निधीमधला 5% जरी खर्च केला असता तरी शाबाशकीच प्रमाणपत्र मिळेल तुम्हाला जनतेकडून. 

अहो उगीचच आपल्या पुर्वज्यानी बांधलेल्या इमारती अजुन दिमाखात उभ्या नाहित. फक्त सिमेंट मधे जान असुन काही फायदा नसतो साहेब, तेवढ इमान पहिजे की काम करणारयामध्ये.


आणि बांधकामाची शाश्वती कधीपर्यंत ...? जोपर्यंत चंद्र- सुर्य आणि पृथ्वी आहे तोपर्यंत... कळालच असेल मी कुणाबद्दल बोलतोय ते, स्वतची जमीन-लत्ता विकून आपल कार्य पुर्ण करणारे कुठे आणि आहे त्यातले तुझी टक्केवारी इतकी आणि माझी इतकी म्हणणारे आत्ताचे बोके कुठे.... नेता नेक होता त्यांचा🚩🚩🚩

भ्रष्टाचाराची कारणे काय असतील ....?

आपल्या भारत देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त आहे.

नोकरीचा अभाव,शिक्षणाचा अभाव,लोभ आणि असमानता,असमानतेमुळे, आर्थिक आणि सामाजिक स्थितीमुळे एखादा व्यक्ती हा भ्रष्टाचारी बनतो. आज माणसाच्या मनात स्वार्थीपणा हा वाढला आहे.

काही लोक हे इतके स्वार्थी झाले आहेत कि, त्यांना आपल्या नातेवाईकां आणि मित्रांपेक्षा जास्त पैसे कमवायचे असतात. म्हणून ते आपला स्वार्थ किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचार या मार्गाचा अवलंब करतात.


भ्रष्टाचार हा एक संसर्गजन्य रोगासारखा आहे. जर हा एखाद्या देशाला किंवा समाजाला लागला तर त्या देशाचे आणि समाजाचे संपूर्ण जीवन नष्ट करू शकतो.

भ्रष्टाचाराला रोकण्यासाठी समाजातील विविध स्तरांवर कडक कारवाई केली पाहिजे. तसेच सरकारने देशातील प्रत्येक बेरोजगार लोकांना रोजगार प्राप्त, शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

त्याच प्रमाणे देशात काळा पैसा वापरणाऱ्या लोकांवर कठोर कायदे केले पाहिजेत. जो पर्यंत हे थांबणार नाही तो पर्यंत देशातील प्रत्येक व्यक्ती आपली सामाजिक जबाबदारी उचलणार नाही.


-सुदन जाधव.

Sunday, April 4, 2021

गुढीपाडवा, छत्रपती संभाजीराजेंचे बलिदान आणि समज-गैरसमज...

    शाळा,कॉलेज म्हणलं की मित्र- मैत्रिणी आल्याच त्यासोबत त्यांच्या गप्पा गोष्टी ... अशीच काही मुलींमधे गप्पा रंगल्या होत्या. त्यातच एकटी बोलली अगं आपला गुढीपाडवा सण  जवळ येतोय काय काय करायच ठरवलेस तू. त्यावर उत्तर म्हणून दुसरी बोलली मी त्यादिवशी साडी आईची साडी नेसणार. आणि कानामधे नविन रिंग घालणार. तोवर पहिलीच रिप्लाई अगं अगं तुझीतर जोरदार तयारी दिसतेय मलापण खरेदीला जायच आहे. मी पण नविन मोत्याची माळ घेणार आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर.....असच गप्पा चालू असताना त्यांचा मित्र तिथ येतो.


ये हाय, वॉट्सएप्प गाइज़ ....सगळे हाय हाय करतात. बोलतो काय गप्पा रंगलेत आणि काय ग काय खरेदी करणार बोलत होतीस...?

त्यावर ...अरे आपला गुढीपाडव्याचा सण येतोय ना मग तेच बोलत होतो आम्ही. गुढी उभा करनार,तोरण बांधायच ,न्यू साडी,मोत्याची माळ....तो बोलला म्हणजे तुम्ही गुढी उभी करता ...? अरे म्हणजे इतिहास माहित नाही तुम्हाला, ज्या दिवशी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे हाल- हाल करुन त्याना मारले आणि त्याचाच आनंद म्हणून महाराजांच्या विरोधकांनी दारात गुढ्या उभ्या केल्या.

सर्वानी यावर होकारार्थी मान हलविल्या आणि बोलले होय खरय हे....आम्ही वाचलोय हे वॉट्सएप्प वरती ...त्यामुळे आम्ही भगवे ध्वज लावतो....बरोबर आहे यांच ....सोशल मिडियावर जे येत ते वाचतात आणि खर समजतात. ना त्याला एतिहास ना सबुत.

आपल्या हिंदु धर्मामध्ये जे सण सांगितलेले आहेत ते एवढे अलिकडच्या काळातील किवा त्याला इतिहासाची जोड नसलेले थोडीच आहेत. आणि आपण म्हणतो ना भगवा ही आपली शान आहे. हो भगवा ही आपली शान आहेच आणि  वर्षातील 365 दिवस आपला भगवा आकाशात सन्मानाने फडकला पाहिजे.पण गुढिच्या जागी भगवा ही संकल्पनाच निव्वळ चुकिची आहे.

आणि राहिला तो विषय आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा ज्याणि इतिहास गाळुन गाळुन चार ओळींवर आणला ते काय इतिहास सांगणार आणि लिहिणार. आपण कित्तेक पुस्तके चाळलीत ना तर वेगवेगळा इतिहास तुम्हाला अनुभवायला मिळेल. पण हा इतिहास वाचलाच पहिजे. उगीचच स्वराज्य उभारल नाही गेल किवा कोणी भेट नाही दिली. ज्याच्या नावाने आजही अंगावर  शहारे येतात ते आपले  "छत्रपती शिवाजी महाराज" आणि याच नावाला पुढे कोणी की लावला तर नकळत पणे तोंडातून शब्द बाहेर येतील...जय.

संपुर्ण हिंदुस्तानाचे दैवत ...ते होते म्हणून आपले देव आज देवळात पहायला मिळतात.

हा आता गुढिचा संधर्भ कुठला असेल तर तो आपल्या प्रभू रामचंन्द्राचा रामायण. त्यात साफ उल्लेख आहे ज्यावेळी प्रभूनी रावणाचा वध केला आणि ते अयोध्येला परत आले त्यावेळी त्यांच्या विजयाचे प्रतिक म्हणून सगळ्या अयोध्यावासीयांनी सर्वांच्या घरावर गुढ्या उभ्या केल्या होत्या. मग आपणच विचार केला  रामायण आणि संभाजी महाराजांचा मृत्यू तर यामधे खुप वर्षांचा कालावधी आहे.

आपल्या नविन मराठी वर्षाची सुरुवात देखील याच दिवशी होते बर का....आता काहीजण बोलतील आपला तर 1जानेवारी ला असतो ना नविन वर्ष. खर बोलायच गेल तर नविन वर्षाची धम्माल सुरु होते ती 31 डिसेम्बर ला आणि ती कशानी दारू आणि नविन वर्षाचा पहिला दिवस आपला उजाडतो कधी तर दुसर्या दिवशी म्हणजेच 1जानेवारीला दुपारी 1-2 ला म्हणजेच दारू उतरेल तेव्हा.

पण याउलट पाहिलात तर ...ज्या दिवशी ब्रह्मदेवाने या पृथ्वीची निर्मिती केली, झाडांना नविन पालवी फुटते,ज्या दिवसाची सुरुवात चैतन्यमय अशा सूर्यदेवच्या दर्शनाने होते तो दिवस म्हणजे चैत्र शुध्द  प्रतिपदा अर्थात आपला गुढीपाडवा. आणी या सण महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतामधे हा सण वेगवेगळ्या नावाणी साजरे करतात.

वेगवेगळ्या राज्यात हा सण वेगवेगळ्या नावाणी साजरे करतात. आतातर विदेशी लोक आपली हिंदु संस्कृती विदेशात सुद्धा आत्मसात करायला लागलेत. 

मग चला यावर्षी सर्वानी आपल्या हिंदु नववर्षाचे जल्लोषात स्वागत गुढी उभा करुन करुयात. आणि भगवा ध्वज सुद्धा  फडकवूया.


पोस्ट द्वारे कुणाच्याही भावना दुखवायचा ऊद्देश नाही, तसे वाटल्यास क्षमस्व...



सुदन जाधव

Friday, April 2, 2021

....आणि ती आलीच

   आदिमानवाने दोन पायांवर चालण्याचे तंत्र शिकून घेतल्याने माणसाच्या मेंदूचा विकास इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक झाला व मेंदूची रचना अधिक क्लिष्ट झाली, अनेक प्राणी हुशार असतात; पण माणूस सर्वांपेक्षा अधिक बुद्धिमान आहे. त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला. मात्र परतफेड करण्याचे साफ विसरलाया बुद्धीमतेच्या जोरावर मानव चंद्रावर तर पोहचलाच पण आता मंगळावर सुद्धा पोहचण्याच्या तयारीत आहे. 

   पण याचा परिणाम थेट पर्यावरणावर होत आहे....पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. कुटुंबातील संख्या वाढू लागली की त्यांचे घर वाढतात आणि घरे बांधण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे व झाडे तोडणे क्रमप्राप्तच ठरते.त्यामुळे जंगलतोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो.

आता राहिला प्रश्न तो जंगलात राहणार्या प्राण्यांचा....जंगलतोडीत कित्तेक पक्ष्यांची घरटी उध्वस्त झाली असतील. कित्येक प्राण्यांचा आसरा गेला,अन्न,सरक्षंण त्यांच्या   जीवनावर तर मानवाने कुर्हाड चालवली.



   वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, ओसाड होणारे डोंगर, वाढत्या शिकारी, जंगलातील नागरिकांचा वाढता वावर, जंगलातील संपत चाललेले पाण्याचे स्रोत, धोक्यात येत असलेला निवारा आदी कारणांमुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ लागल्याच्या घटनांमध्ये काही वर्षात वाढ झाली आहे. स्थानिक नागरिक, पाळीव प्राणी, शेती आदींना या वन्यप्राण्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. याला जबाबदार कोण? राजकीय पुढारी व सरकारी अधिकारी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या फोटो व प्रसिद्धीसाठी येतात. लागवड केलेल्या वृक्षांची कोणत्याही प्रकारे काळजी न घेतल्याने तसेच संवर्धनाचे कोणतेही नियोजन नसल्याने लागवड केलेल्या शंभर झाडांपैकी पाच झाडेही जगत नाहित. 

   शहरात राहणाऱ्या माणूस या प्राण्याला दुसऱ्या प्राण्यांना पहायची इच्छा झाली की त्याला प्राणिसंग्रहालयाचा रस्ता धरावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरून अवचित एखादा हत्ती दिसला की त्याचं मन हरखतं, पण आपल्या वस्तीत बिबट्या आला की मात्र भीतीने अक्षरश: गाळण उडते. 😀

   उन्हाळयाचे ते दिवस आणि  एके दिवशी जिल्ह्याच्या मध्यभागी एकाला बिबट्या दिसला. आणि म्हणता म्हणता वार्ता सगळीकडे पसरली ....पोलिस यंत्रना सज्ज झाल्या. कदाचीत तो(बिबट्या) घाबरलेला असावा  त्यामूळे तो दिसेल त्या रस्त्याने पळत होता. त्यात त्याचा शिकार बनला तो एक कुत्रा ... बिचारा कुत्रा तो ही भर उन्हात सावलीच्या आडोशाला म्हणून निजलेला.

    आतातर बिबट्याला पकडल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने पोलिसाना काही भाग बंद करावा लागला...तास- दोन- पाच तास उलटून गेले मात्र तो काही लावलेल्या जाळ्यात सापडेना.अखेर संध्याकाळी 10च्या सुमारास त्याला भुलिचे ईजेक्शन देऊन पकडन्यात यश आले. सकाळी  7 वा. पासुन ते रात्री 10वा.पर्यंत त्याला पकडेपर्यंत शहरवासीयांच्या जिवात जीव नव्ह्ता. शेवटी त्याला पकडन्यात यश आले आणि ते ही सही सलामत. तेव्हा समजले ती एक 3 वर्षाची मादी बिबट्या होती. 

   खरच कौतुकास्पद काम होत त्या टीमच... कारण तिला काहीही इजा न करता त्यानी तिला पकडले होते आणि यामुळेच का होईना सर्वाना याची ही खात्री झाली की तिला तिचे हरवलेले घर नक्की परत मिळेल.👌👌

   पण मित्रानो खरच ते आपल्या शहरात येत आहेत की आपण त्याना तसे करण्यास भाग पडतोय .....?कदाचीत माझ्या या प्रश्नामूळे सगळे अनुत्तरीत राहतील...



आपल्या प्रतिक्रीया जरुर कळवा.

सुदन जाधव.

सरत्या वर्षाला निरोप देताना...

      ए क वर्ष एका पुस्तका सारख असतं. नवीन वर्ष आणि नवीन पुस्तक, आणि पुस्तकातले प्रत्येक पान म्हणजे आपला रोजचा दिवस. पुस्तकातल प्रत्येक एक प...