Tuesday, March 30, 2021

पँन आणि आधार कसे लिंक कराल...

   पँन आणि आधार 31मार्च पर्यंत लिंक करा,नाहितर कार्ड यूज़लेस होईल....

    पँन आणि आधार लिंक होणे खुप मह्त्वाचे आहे. कारण जर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक नाही केला तर पँन कार्ड निष्क्रीय होईल,नाहितर 10000 रु. दंड होवू शकतो.


आता म्हणाल की लिंक नाही केलो, तर काय होणार ...

तर समजून घ्या आपल्याला जर बँकेत नविन खाते उघडायचे असेल तर त्यामधे आपल्याला अडचणी येऊ शकतात. तसेच आपले मित्र- नातेवाईक फंड अथवा शेयर्स ची खरेदी- विक्री करत असतील तर त्यांनाही याचा मोठा फटका बसू शकतो. अजुन एक सांगायच राहुन जाईल जर आपण 50 हजार रु. पेक्षा जास्त रक्कम बँकेत भरायची अथवा काढायची असेल तर आपणाला आधार आणि पँन लिंक करायलाच पाहिजे. यासाठी आपण 31 मार्च 2021 पर्यंत आपले पँन कार्ड स्टेटस चेक करुण आधार सोबत लिंक करुण घ्या.

आधार अणि पँन लिंक आहे की नाही कस चेक कराल....

* आयकर विभाग च्या अधिकारीक वेबसाइट्स वर जा...www.incometaxindiaefiling.gov.in 

* डाव्या बाजूस लिंक आधार चा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा.

*जर आपला आधार पँन कार्ड अगोदर लिंक केले अथवा नाही तपासायला click here वर क्लिक करा.

*दुसर्या पानावर आधार कार्ड न. भरुन view link aadhaar status वर क्लिक करा.

*आधार पँन लिंक असेल तर त्याची माहित मिळून जाईल आणि नसेल तर  त्याचीही माहिती मिळून जाईल.

पँन आणि आधार लिंक करायची पद्धत....

1. मैसेज द्वारे-

आपल्या चालू मोबाइल वरुन एक मेसेज पाठवुन आपण पँन आधार सोबत लिंक करु शकतो.

आपणास UIDPAN <SPACE> 12 अंकांचा आधार क्रमांक  <SPACE> 10 अंकांचा पँन नम्बर लिहुंन तो 567678 किंवा 56161 या नम्बर ला पाठवा.

उदाहरणार्थ UIDPAN 111122223333 AAAAA1111Q

2. ऑनलाइन-

*https://www.incometaxindiaefiling.gov.in/home  वर जा

*आधार अणि पँन लिंक आहे की नाही कस चेक कराल....

* आयकर विभाग च्या अधिकारीक वेबसाइट्स वर जा...www.incometaxindiaefiling.gov.in 

* डाव्या बाजूस लिंक आधार चा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा.

*आता जे नविन पान उघडेल त्यामधे आपला आधार नंबर पँन नंबर आणि आपले नाव (आधारकार्ड वर आहे ते) भरा.

*जर आपल्याकडे अधारकार्ड वर जन्म वर्ष च फक्त छापले असेल तर तिथे दिलेल्या त्या पर्यायांवर क्लिक करा.

*त्यानंतर कप्च्या कोड टाका आणि लिंक आधार वर क्लिक करा.

*यानंतर एक नविन सुचनादर्शक पान उघडेल ज्यामधे लिहले असेल की आपले आधार आणि पँन लिंक झालेले आहे.

कृपया आपले आधार आणि पँन अश्याप्रकारे लिंक करा.


-सुदन जाधव


Sunday, March 28, 2021

मोबाइल नव्हता तेव्हा ...



      महिना दिड- महिन्यापूर्वीची गोष्ट ... रोजच्या कामातून थोडी विश्रांती आणि रोड ट्रिप म्हणून फिरायला जायचा प्लान केला. आम्ही चारजण, त्यात एकाची चारचाकी असल्याने गाडीचा विचार करण्याचा काही प्रश्नच नव्ह्ता. ठरल्याप्रमाणे वीकेंड ला सर्वजण वेळेत हजर होते म्हणून निघायला वेळ नाही झाला. प्लान होता तो कोकणामध्ये जायचा.... आमच्यापैकी एक होता प्रो. फोटोग्राफर अणि बाइक राइडर(टोपण नाव) त्याने येतानाच कैमरा आणला होता. त्यामूळे जाताजाता आवडतील ते क्षण कैमरा मधे टिपत आम्ही पुढे-पुढे सरकत होतो. चारचाकी मधे तशी लेटेस्ट गाणी चालू होती. ऐकत बोलत आमची गाडी रस्त्यावर धावत होती. चार तासाच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या पिकनिक स्पॉट ला पोहोचलो...


     दुपारचे 3 वाजले होते, आल्यासरशी सगळे फ्रेश झाले. वाटल होत बाहेर पडतील पण काय मेली सगळे मोबाइल ला बिलगून बसली. आता मी तर काय करनार म्हणून मी ही माझा मोबाइल घेउन बसलो.पण मज्जा काय कोणाच्याही मोबाइल नेटवर्क प्रोवाइडर ला रेंज नव्हती....त्यातच एकटा म्हणाला तुझ्या मोबाइल मधली गाणी मला सेंड कर ....म्हणजे आलोय फिरायला पण इथपन मोबाइलच? मनात विचार आला मोबाइल असेल तर माणूस जवळ असुन देखील किती लांब  असतो आणी यातच मी कधी मोबाइल च्या आधिच्या दुनियेत गेलो समजल सुद्धा नाही.
   जन्म गावाकडचा...गावात तश्या जेमतेम सोई-सुविधा होत्या. त्यावेळी जाच्या घरी टीवी अणि दूरध्वनी होता तो मध्यम वर्गिय समजला जायचा. त्यातला मी अशाच एका घरातला. त्यावेळी मोबाइल नावच ड़बड कुणाला माहित अणि भविष्यात  धुमाकूळ घालेल हे देखील माहित नव्हत त्यामूळे  कुठे काही निरोप-आमंत्रण वगेरे असेल तर प्रत्यक्ष जाव लागयच नाहितर आता सारख एक मैसेज दिला टाकुन की झाल अस नव्हत...



    त्यावेळी रेडिओ खुप प्रसिध्द होता. बातम्या,विविधभारती(आवडीनुसार गाणी लावले जायचे) असे कार्यक्रम सर्वजण न चुकता ऐकायचे. कधी मला कळाल की क्रिकेट मैच आहे 2दिवसात भारत आणी अन्य देशाची तर तेव्हापासुन माझी रेडीओ दुरुस्ती चालू व्हायची नाहितर मोबाइल असता तर रेपैर ची उस्तुकता अणि माहिती मिळलीच नसती डायरेक्ट ऑनलाइन मैच पहिली नसती का इंटरनेट वर ...पण काहीही म्हणा रेडीओ ची कॉमेंन्ट्री ऐकण्यात काही मजा औरच होती जस की "ये लगा बिसएनएल चौका"....


    काही आपले आप्त लोक जे देशसेवा बजावत आहेत (इंडियन आर्मी ) त्यांची पत्र,तार घरी यायची कधीकधी वाचयला मी जायचो,वाचयचो मी पण डोळे ऐकणारयान्चे ओले व्हायचे. काय शब्दात अणि लिहन्यात प्रेम ओतल असेल लिहणार्यने आपल्या मनसा बद्दल याच प्रत्यक्ष उदाहरन होत ते ....त्यामुळेच ते गाण देखील एकदम परफ़ेक्ट होत बौर्डर पिक्चर मधील...संदेसे आते है हमे तडपाते है ....नाहितर आता मोबाइल मैसेज मधे असले प्रेम क्वचीतच पहावयास मिळेल.


   कधी कधी खेळता खेळता आठवायच अरे उद्या शाळेत गृहपाठ दाखवायचा आहे, पण लिहलाय कुठे ???

मग पळत सुटायच ते थेट हुशार, रोज अभ्यास पुर्ण करनारया मित्राकडे....घरी गेल्यावर समजायच मित्र घरी नाही दुकांन राशन आणायला गेलाय, येउपर्यंत थांबायच तोपर्यंत त्याच्या घरच्यांनी आमची कुंडली काढलेली असायची,तोंड लपवत लपवत गृहपाठ घेउन यायचो ...नाहितर अत्ता ये चल मला याच्या नोटेस पाठ्व वॉट्सएप्प ला लवकर तार एका मिनिटात फोटो मिळतो जसाच तसा पण यामागे आनंद वाटत असेल असे मला नाही वाटत जो त्यावेळी मिळायचा.


   पेपर वाचयला सायकल दुकानात जाणार तिथे अगोदरच नम्बर असायचे पेपर वाचयला...त्यातच ओळखी व्हायच्या. पेपर मधिल कोडी सोडवायला मज्जा यायची त्यामूळे कधी कधी 2-3 मी मधे कोडी सुटायची. आता मोबाइल मधे ऑनलाइन पेपर, कोडी इ .असुन देखील कोन बघत सुद्धा नाहित...कागदी पेपर वाचण्यात काही मजा वेगळीच असते कम्पेर ऑनलाइन.


    विचार करा त्यावेळी प्रेम-विर एकमेकांशी कस संवाद साधत असतील...? काय काय शक्कल लावले असतील ते देवच जाने ....त्यामूळे एक गाण परत आठवत अणि एकदम सुट होत ते म्हणजे ...कबूतर जा जा जा ..पहले प्यार की पहली चीट्ठि...नाहितर अता 50 मैसेज फक्त मेरे बाबू ने थाणा थाया यातच जातात .


सुर्य आपल्या घरी. गेला तरी आमचा खेळ काही संपायचा नाही,आणी आम्ही काही आमच्या घरी जायचो नाही ....पण घरी कोन चिंतेत तर कोन चिडून अणि एकदा का घरी गेलो की "ये हान की बडिव"....कुठ व्हतास? अणि काय -काय म्हणून हाणायचे. त्यात मोठा भाऊ... तेल-मिठ लावायला असायचा. "मी बोलवायला गेलेलो पण आला नाही बघा "... मग अजुन मारायचे.

   कधी कधी मामा घरी यायचा बैलगाडी घेउन अणि एकदमच मामाच्या गावी जायचा प्लान व्हायचा....क्विक प्लान सर्वानाच आवडतात. पण मामाच्या बैलगाडीतून मामाच्या गावाला जायच हे वेगळच होत त्या काळी...जोडी होती प्रधान अणि जामदार या दोन बैलांची..नाहितर अता कसली आलीय  मज्जा लोक मोबाइल वर बोलतात, आलोय, येतोय पण प्रत्तक्ष आहे कुठे ते त्यालाच माहित असत.
......त्यातच कोणीतर ओरडल...अरे देतोयस ना गाणी अणि मी दचकून भानावर आलो.....पण त्या 5-10 मी. मधे मी पुर्ण बालपणत फिरुन आलो हे कुणाला कस सांगू....
बालपण विना मोबाइल चे अप्रतीम होत.


...सुदन जाधव



Friday, March 26, 2021

मोबाईलची बॅटरी

 📱मोबाईलची बॅटरी लवकर उतरते?


विज्ञान शाप की वरदान म्हणून विचारलो तर काहीजण म्हणतील वरदानच की आणी काही बोलतील शाप(आजोबा-पणजोबा). मानवाने आपल्या बुद्धीचा व कल्पकतेचा वापर करुन खुप प्रगती केलीय. खुप अवघड गोष्टी सोप्या देखील केलेल्या आहेत. एका सेकंदात/मिनिटात माहिती, डाटा,देवाणघेवाण,संवाद किंवा आर्थिक व्यवहार करु शकतो. त्यासाठी कंप्यूटर ,लैपटॉप,टैबलेट,मोबाइल इ . यांच्या द्वारे आपण इंटरनेट वापरु शकतो....पण सगळ्यात सोयीस्कर असा ,सगळ्याना बिलगून असणारा असा लाडका आपला मोबाइल (मराठी मधे मोबाइल ला भ्रमणध्वनी म्हणतात). 

📱मोबाइल चा प्रमुख वापर म्हणजे कॉल आणी मैसेज साठी  होतो पण बैटरी खराब असेल तर ते ही काम होऊ शकत नाही....त्यात उन्हाळा सुरु झालय तसेच सर्वाना मोबाइल गरम आणी बॅटरी समस्या उध्भवत असतीलच म्हणून हा लेख लिहतोय ....

तूम्हाला तर माहीतच आहे की, मोबाइल ची बॅटरी दोन ते तीन वर्षे तरी टिकायला हवी (सर्वसाधरण )मात्र पाच ते सहा महिन्यांत बॅटरी कशी काय बरं खराब झाली?  

बऱ्याचदा आपण मोबाईल विकत तर घेतो मात्र त्यामध्ये जे मॅन्युअल असते ते वाचत नाही, या माहिती पुस्तकेत संपूर्ण माहिती दिलेली असते. मात्र आपण चार्जिंग करताना ज्या चुका करतो त्यामुळे आपली बॅटरी लवकर उतरते व कधी कधी बॅटरी फुगते देखील, तर काही जणांचा मोबाईल गरम होतो, वापर करताना किंवा चार्जिंग करताना देखील गरम होतो. तर हे सुद्धा चार्जिंग करताना जी आपण चूक करतो त्यामुळेच होते. म्हणून आज मी अशा पाच गोष्टी सांगणार आहे  की जर या पाच गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा मोबाईल चांगला राहील व तुमची बॅटरी देखील दीर्घकाळ टिकेल. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

1) पहिली गोष्ट म्हणजे, ज्यावेळी तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावता त्यावेळी तुमच्या मोबाईलच्या मागचे कव्हर काढून मोबाईल चार्जिंगला लावावा. तुम्हाला वाटेल असे का करायचे तर याचे कारण असे आहे की, हे जे कव्हर असते हे बॅटरीला मिळणारा हवेचा पुरवठा थांबवते, थोडक्यात बॅटरीला हवा मिळत नाही, आणि परिणामी मोबाईल गरम होऊ लागतो आणि ज्यावेळी मोबाईल गरम होतो त्यावेळी आपोआपच बॅटरीवरती त्याचा खूप निगेटिव्ह इफेक्ट् पडतो, ज्यामुळे बॅटरी लवकर खराब होते….

2) दुसरी गोष्ट, तुम्हाला कंपनीने जो चार्जर दिला आहे तोच चार्जर तुम्ही मोबाईल चार्ज करताना वापरा. तुम्ही जर कोणताही चार्जर वापरू लागलात, उदाहरणार्थ तुमचा जर Samsung चा मोबाईल असेल आणि त्याला चार्ज करायला Oppoचा चार्जर वापरत असाल तर त्यामुळे देखील तुमची बॅटरी लवकर खराब होते, कारण प्रत्येक कंपनीने त्यांच्या मोबाईलला त्यांच्या चार्जरचे MAH म्हणजेच किती अँपिअर करंट वापरायचा हे ठरलेले असते तर तोच चार्जर आपण वापरा.

3) तिसरी गोष्ट, मोबाईलला चार्जिंग करताना मोबाईल नेहमी switch off करावा, जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर कमीत कमी flight mode वर तरी ठेवावा. जर तुम्ही तसाच मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर त्यामुळे एक बाजूला चार्जिंग चालू राहते आणि दुसऱ्या बाजूला मोबाईलचे नेटवर्क चालू राहत, म्हणजे मोबाईल कामही करतोय आणि इकडे चार्जिंग देखील चालू आहे, थोडक्यात तुम्ही जॉबवर देखील गेलाय आणि काम करता करता जेवण पण करताय ,तर अशी परिस्थिती होते, त्यामुळे मोबाईल चार्जिंग होण्यास फक्त दीड ते दोन तास लागतात फक्त एवढाच वेळ तुम्ही तुमचा मोबाईल switch off करून ठेवा…

4) चौथी गोष्ट, आपली बॅटरी किती टक्के पर्यंत चार्ज करायची हे अनेकांना समजलेले नाही, त्यामुळे काही लोक 100 टक्के पर्यंत चार्ज करतात, आणि बरेच लोक असे आहेत की जे मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावतात…. कंपनीचे मॅन्युअल असे सांगते की, बॅटरी 90% ते 95% पर्यंत चार्जिंग करा, आणि 100 पर्यंत चार्जिंग करू नका. जे लोक हा नियम पळत माहीत त्यांचे मोबाईल लवकर खराब होतात व बॅटरी देखील फुगते आणि ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम 100 टक्के होतो…..

5) पाचवी गोष्ट, ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कंप्युटर्स वगैरे आहे, ते त्याला USB केबल जोडतात आणि मग त्याला मोबाईल 24 तास मोबाईल लावून ठेवतात. तुम्हाला सांगू इच्छिते की ,त्या USB मधून तुमच्या मोबाईलची चार्जिंग तर चालू असते मात्र त्याला जो करंट मिळतो, जे MAH मिळते ते अतिशय कमी मिळते, त्यामुळे मोबाईल खूप हळू चार्ज होतो त्यामुळे देखील मोबाईल खराब होतो करण USB केबलचे काम तुमच्या मोबाईल मधील डाटा कम्प्युटर मध्ये घेणे किंवा कम्प्युटर कडून घेणे हे आहे. म्हणून तुम्ही USB ने मोबाईल चार्जिंग कधीही लावू नये..

धन्यवाद....



Thursday, March 25, 2021

शाळा

 माझी शाळा...🏫

ब्लॉग लिहायचा विचार मनात आलेला, मग कोणत्या विषयावर ब्लॉग लिहायचा ....? सहाजिकच सर्वाना हा प्रश्न पडतोच पण यावर मला मात्र पटकन उत्तर सापडल... ज्यामुळे मी ब्लॉग लिहायला स्वतला समर्थ समजतो त्यामागे पहिला श्रेय जातो तो माझ्या शाळेला.... एस.एम.हायस्कूल,मालगाव.


     असाच मागच्या रविवारी एका कार्यक्रमानिमीत्त गावी जान्याचा योग आला. जाताना सोबत तसा शाळेतील माझा मित्रच होता त्यामूळे जाता जाता शाळेतील आठवणीतच मालगावत पोहोचलो....पोहचताच हे ही समजल की कार्यक्रम सुद्धा शाळेनजिक असणारया सभागृहात मधे होता....पोहचतच काही वेळ तसा गाडी पार्किंग केली तिथेच होतो. बोलता बोलता सहज नजर गेली ती शाळेच्या इमारतीकडे आणी तिथूनच चालू झाली ती शाळेतील चर्च्या ..... तसे शाळेतील 5-6 मित्र ही आलिच होती कार्यक्रमाला त्यामूळे तो असा आणी तो तसा गप्पा रंगल्या होत्या... पण आठ्वणीतच कही मन लागेना त्यामुळे आमुची पाऊले नकळतच शाळेकडे वळली ...आणी  शेवटी शिक्षणाच्या माहेरघरी आम्ही पोहचलो ...हा माहेरघर..... कॉलेज झाले, पदवी मिळाली पण या शाळेने आम्हाला जे काही शिकवले ते जगात कसे जगावे याबद्दल होते... शिक्षक कायम म्हणायचे ,मुलानो तुमचे हे दिवस म्हणजे सोन्याचे दिवस आहेत हे कधीच परत येणार नाहित ...आणी त्यातला प्रत्तेकजन हेच बोलत होता ....लहान झालो तर परत याच शाळेचा विदयार्थी होईन .खरच यार ते दिवस परत आले तर ....?

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ....

माझा सर्व यशामधे मुख्य वाटा असणार्या माझा शाळेला आणी माझ्या गुरुजनाना माझा नमस्कार ....🙏🙏🙏

सरत्या वर्षाला निरोप देताना...

      ए क वर्ष एका पुस्तका सारख असतं. नवीन वर्ष आणि नवीन पुस्तक, आणि पुस्तकातले प्रत्येक पान म्हणजे आपला रोजचा दिवस. पुस्तकातल प्रत्येक एक प...