नुकताच एक सिनेमा प्रदर्शित झाला, अखंड हिंदुस्तानचे श्रद्धास्थान, दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शिलेदार यांच्यावर आधारित पन्हाळा ला घातलेल्या सिद्धी च्या विळख्यातून सुटून वीर शिवा काशिद (प्रतिशिवाजी) आणि 'घोडखिंडीत' अखेरच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत केलेली मावळ्यांची शर्त...
तसा त्याला सिनेमा, सिरियल, वेब सिरीज पाहण्याच वेड कमीच. पण आपल्या आवडत्या विषयावर आधारित कोणता सिनेमा आला तर तो तसा आवर्जून पाहणारा. असाच दैनंदिन कामातून वेळ काढून त्याचे सिनेमा पहायला जायचे ठरले. रात्रीचे तिकीट बूक केल्यामुळे ऑफिस काम आवरून मस्त रात्रीचे जेवण आटपून तो सिनेमा पहायला गेला.
सिनेमा पहायला शिवप्रेमींची गर्दी खूपच दिसत होती, बूकिंग विंडो वर खूप गर्दी होती. तिकीट खरेदीसाठी एकच झुंबड ,त्यातच एकटा ओरडला तिकीट संपले आणि त्याने हाऊसफुल्ल असा बोर्ड लावला आणि विंडो बंद झाली.याचे तिकीट अगोदरच बूक असल्यामुळे तिकीट घेण्याचा काही प्रश्नच नव्हता.
सिनेमा चालू झाला, महाराजांची एंट्री प्रथमदर्शनी झाली. प्रत्येक व्यक्तीने आपापले पात्र उत्तमरीत्या रंगवले होते. बाजी, फुलाजी रायजी ,बहिर्जी, शिवा, बांदल ईत्यादी....अर्ध्यावर सिनेमा येऊन पोहोचला होता उत्सुकता होती ती महाराजांच्या सलामत सुटकेची. आणि तो प्रसंग आलाच...
स्वराज्याचा तिसरा डोळा, बहिर्जी नाईक यांच्या उत्तम नियोजना प्रमाणे महाराज एका पालखीत बसुन तर दुसर्या पालखीत प्रति शिवाजी म्हणून ओळखला जाणारा सूदमुद शिवाजी महाराजांसारखा दिसणारा वीर शिवा काशिद बसणार होता.....एक पालखी विशाल गडाच्या दिशेने तर दुसरी सिद्धी ला गाफील ठेवण्यासाठी त्याच्याच रोखाने पालखी शिवा काशिद यांची... ज्या ठिकाणी त्या दोन पालख्यांचे रस्ते विभागनार होते तेथे महाराज पालखीतून खाली उतरले व शिवा काशिद यांना आपल्या सोबतच विशाल गडाकडे येण्यास आग्रही केले, परंतु....ऐकणार तो मावळा कसला, आपल्या राजावर जीव ओवाळून टाकायला मागेपुढे न पाहणारी... राजांना पाहून शिवा म्हणतो कसा... माझ अणि माझ्या कुळाच नशीब राजे, मी शिवाजी महाराज म्हणून मला मरण येणार ,यापेक्षा मोठ भाग्य आणि काय....
या वाक्यावर याच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला आणि तो आपल्या भूतकाळात हरवून गेला...
असाच जेव्हा तो कॉलेज मध्ये शिक्षण घेत होता, तेव्हा तो काही महिने आपल्या पाहुण्याच्याकडे रहायचा. पावसाळ्याचे दिवस होते गणपतीचा सन/उत्सव तोंडावर होता. गावातच मोठा श्रीमंत गणेशोत्सव मंडळ होता. प्रत्येक वर्षी गणपतीच्या निमित्ताने आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई बरोबर, देखावा असायचा. यावर्षी काहीतर ऐतिहासिक म्हणून प्रति शिवाजी महाराज आणि प्रति राणी लक्ष्मीबाई यांची घोड्यावरून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. जवळ- जवळ पात्रांची निवड झाली होती....
दिवस उजाडला , सगळ्यांना ओढ लागली होती ती सायंकाळच्या मिरवणुकीची. बघता- बघता दुपार टळून रात्र होऊ लागली. आणि एकच धांदल उडाली. सगळेजण महाराजांची मिरवणूक म्हणून गावभर सडा, रांगोळ्या, रस्तावर फुलांची आरास करू लागले...
शिवाजी महाराजांचे ज्यानी पात्र केले होते त्यांना आवरण्याचे किवा मेकअप चेक काम याच्याकडे सोपवले होते....राजांचे सर्व अलंकार जडीत पोषाख आणला होता. मेकअप चे काम चालू झाले. तास उलटून गेला, लहान-लहान मुले गर्दी करून खिडकीतून डोकावून पाहत होती. मोठ्यांच्या येरझारया वाढत होत्या. लवकर आवरण्यासाठी याचा प्रयत्न चालू होता.
अंगावर पोषाख चढवून झाला होता, चेहर्यावरचा मेक अप झालेला. राहिला होता तो फक्त डोक्यावर टोप चडवायचा. इतक्यात एकाने काही करेक्शन करता मेकअप चालू केला. तोवर याने नकळत पणे टोप आपल्या डोक्यावर चढवला आणि आरश्यात पाहू लागला आणि मानत विचार करू लागला की मी पण थोडफार महाराजांसारखे दिसतो का..?

कोणाची तर नजर याच्यावर पडली. आणि तो धावत आला तोवर याने टोप आपल्या डोक्यावरून काढला होता. धावत आलेल्या व्यक्तीने पुन्हा तो टोप डोक्यावर चढवायला लावला आणि आणि तो तसाच धावत जाऊन आणखीन काही 5-6 लोकांना घेऊन धावत परत आला . सगळे अवाक् झाले...म्हणजे पात्र करतोय एक, पण त्याच्यापेक्षा हा कितीपटीने तरी मिळतेजुळता दिसत होता महाराजांसारखा....सगळ्यांचा संगनमताने यालाच महाराज करायचे ठरले तसाच यांच्या डोळ्यातून आनंदाश्रूनी आपला मार्ग तेव्हाच मोकळा करून घेतला होता.... त्यादिवशी गावभर घोड्यावरून प्रति शिवाजी महाराज म्हणून राजांंची मिरवणूक निघाली सर्वानी राजांचे औक्षण केले. राजांच्या प्रति असणारे प्रेम सर्वाच्या चेहर्यावरून दिसत होते, लहान-मोठय़ा मुलांचा शिवाजी महाराज की जय हा जयघोष थांबत नव्हता. त्याला स्वताचे भान राहिले नव्हते सगळे ओरडत होते, पुढे लेझीम चा खेळ चालू होता. हे पाहून त्याची छाती फुगली होती.... आज तो, तो राहिला नव्हता त्याच्या रूपाने सर्वांना शिवाजी महाराजांचे दर्शन घडत होते...
मित्रानो कित्तेक लहान मुलांना स्पाइडरमेन, शक्तिमान, सुपरमॅन, यांचे कपडे आवडतात आणि घेतात, घालतात पण शिवाजी महाराजांचा पोषाख जेव्हा अंगावर चडतो तेव्हा त्याचा आदर आणि आनंद काही वेगलाच असतो...
इतक्यात शिट्याच्या आणि जयघोषाच्या मोठ्या आवाजाने हा भानावर आला... पण यांच्या जीवनात अचानक पणे घडून आलेला आणि शिवाजी महाराज बनण्याचा योगायोग या जीवनात घडून गेला यावर त्याने देवाचे आभार आणि धन्यता मानली....
- सुदन जाधव