शाळेत गेल्यावर चित्र काही वेगळच असत ना...प्रत्येकजण आपल्या मर्जीने काम करत असतो. कोणी झाडू मारतय,कोणी झाडांना पाणी घालतो आहे, कचरा वेचनारे, काही मुख्य फळ्यावर आजचा सुविचार आणि दिनविशेष लिहिण्यात मग्न तर काहीजण आपल्या खेळाच्या नादात...
कधीकधी शाळांचा खूप कंटाळा येतो. सतत अभ्यास करावा लागतो. एकाच वर्ग खोलीत बसून राहावे लागते. हवे तेव्हा हवे ते करता येत नाही. गृहपाठ केला नाही तर शिक्षा होते. जरा चूक झाली की बाई आमच्या आई-बाबांना बोलावतात. परीक्षेत नापास झाल्यावर खूप दुःख होते. म्हणून वाटते की शाळा बंद झाल्या तर खूप बरे होईल हा सगळा त्रास वाचेल. मात्र शाळा बंद झाल्या तर खूप नुकसान होईल. शाळेमुळे मित्र मिळतात.
कोरोनाच्या परिस्थितीत शाळा संपूर्णपणे बंद झाल्या....
*सवेरे सवेरे, यारों से मिलने, बन ठन के निकले हम
सवेरे सवेरे, यारों से मिलने, घर से दूर चले हम
रोके से ना रुके हम , मर्ज़ी से चलें हम
बादल सा गरजें हम , सावन सा बरसे हम
सूरज सा चमके हम - स्कूल चलें हम*
त्यामुळेच रोजचा रस्त्यात होणारा मुला- मुलींची चा किलबिलाट हा शुकशुकाट मध्ये बदलून गेला...गेली दोन वर्ष झाले शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट नाही ना काही. काही विद्यार्थ्यानी शाळेचे तोंड सुद्धा न पाहता वरच्या वर्गात गेली. वरच्या वर्गात गेल्यावर होणारी वह्या- पुस्तकांसाठी खरेदी साठी भयाण शांतता दिसते....
प्रत्येक शाळेचा गणवेश आणि त्याप्रमाणे त्यांची ओळख.... शाळा म्हंटलं की आठवते ती शाळेची प्रार्थना आणि राष्ट्रगीत.... मला आजही आठवत ते एका सुरात गायलेले राष्ट्रगीत ....आठवले तर आजही डोळ्यात पाणी येत....कुठे गेले ते दिवस?
किती दिवस झाले शाळेची घंटा ऐकून...मुलांचा शाळेत मित्रासोबतचा खेळ, सलग तासाचा कंटाळा, गणिताचं भय, मराठीची अभंगवाणी, विज्ञान आणि रासायनिक क्रिया,चित्रकलेचा थाट, मजेचा ऑफ तास, एकमताने घेतलेला PE चा तास, त्यात सेक्रेटरीने केलेली तक्रार आणि खाल्लेला मार,दुपारच्या सुट्टीत एकत्र खाल्लेला डबा...सर्वकाही थांबल.
शाळेचे वर्गही मुलांना शोधत असतील का हो? मग तो हुशार असो किंवा नसो....प्रत्येक विद्यार्थी हा शाळेचा लाडकाच की!
पॉकेट मनी मधून शाळेसमोर विकायला येणारे पेरू, चॉकलेट, बोरकुट, चिंच इत्यादी. म्हणजेच शालेय जीवमधील स्नॅक्स आणि त्यांच्यावरच विक्रेत्यांचे चालणारे कुटुंब सगळ बंद झाल...आता कस उदरनिर्वाह करत असतील ते?
कोरोनाच्या परिस्थितीत शाळा संपूर्णपणे बंद झाल्या. मात्र, विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करिता ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु झाले. पण ग्रामीण भागातील विद्यार्थांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी कुठलेही साधन नव्हते. त्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॅाप अथवा टॅब हे तर दूरचंच…. काही गावांमध्ये तर मोबाईलला रेंज देखील नाही. अशा सर्व परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे ऑनलाईन शिक्षण घेतले असेल याची कल्पना आपल्याला करता येईल. मात्र, दुसरीकडे शहरी भागातील विद्यार्थ्यांनाकडे सोईसुविधा असल्यामुळे त्यांचे ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे सुरु होते. याच काळात ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये एक पुसटशी रेषा निर्माण झाली आहे.
कोरोनावर मात करुन आपण शाळा पुन्हा एकदा सुरु केल्या आहेत हा आनंद व्यक्त करणे चुकीचे ठरेल कारण जरी शाळा सुरु झाल्या असतील तरी अनेक मोठ्या समस्या आपल्या पुढे उभ्या आहेत. कारण अजूनही कोरोनाचे संकट गेले नाही. शाळांमधून कोरोनाचा प्रसार होणार नाही, याकडे लक्ष देणे सर्वात महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था कशी आहे, त्यांचा जो वेळ व्यर्थ केली त्याची भरपाई कशी करता येईल, यावर विचार करण्याची गरज आहे.
-सुदन जाधव