Tuesday, December 21, 2021

जीवनगाणे गातच रहावे...

 जगण्याला आणि काय हव...

     सुरुवात एक सुंदर असा दृष्टांत देऊन करतो-

एका भल्या मोठय़ा शहरांमध्ये एक प्रसिद्ध चित्रकार राहत होता. त्याने एके दिवशी सुंदर अस चित्र रेखाटन करून ते शहराच्या मुख्य चौकात लावून दिल आणि त्याखाली कमेन्ट बॉक्स म्हणजेच ज्या कोणाला या चित्रांमध्ये चुकीच वाटेल तिथे खुण करा अस वाक्य लिहून टाकले.

      तो दिवस निघून गेला, दुसर्‍या दिवशी त्या चित्रकाराने पाहिले तर त्याचे पूर्ण चित्र खराब झाल होत. कशाने तर लोकांच्या कमेन्ट ने. यावर त्याला खूप वाईट वाटले आणि तो स्वतःशीच पुटपुटला "करायला गेलो एक आणि झाल एक" आणि तसाच तो निराश होऊन घरी चालू लागला.....काही अंतर पुढे गेल्यावर वाटेत त्याला त्याचा मित्र भेटला आणि त्याला उदासीनतेवर विचारताच त्याने त्याला घडलेला सर्व किस्सा सांगितला. 

     यावर त्याचा मित्र उत्तरला, उद्या असच एखाद चित्र बनवून तिथेच लाव आणि यावेळेस कमेन्ट म्हणून लिही की जाला कोणाला या चित्रांमध्ये काही कमी वाटते त्याने ती बरोबर करा.आणि खरच यावर अस झाल की दुसर्‍या दिवशी त्यावर एकही कमेन्ट मार्क नव्हता. म्हणजेच...? चुका शोधता येतात मात्र एखाद्याला दुरुस्त करताना मात्र खूप कष्ट होतात.

     जग जेव्हा म्हणत असत की सगळ काही संपलय आता... पण जिद्द हळूच कानात म्हणत असते अजून एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे, आणि हे बरोबर देखील आहे.


     आपल जिवन म्हणजे एखाद्या आईस्क्रीम प्रमाणे आहे, खाल्ल तरी वितळणारच आहे ठेवल तरी वितळणार. आणि असच काही आहे आपल्या आयुष्याच. त्यामुळे लोकांच मनावर घ्यायचं सोडून द्या आणि बस जिवन जगायला शिका.

कारण - चलती का नाम गाडी है,और रुकती का नाम अनाडी है. 

यासाठी कायम चालत रहा- दुनिया पीछे पीछे चलेगी.





-सुदन जाधव




Wednesday, December 15, 2021

जुनी गाणी आणि तशाच जुन्या आठवणी ...

    रोजच्या धावपळीतून आणि ऑफिस कामातून कधी सोमवार चा शनिवार होतो समजत सुद्धा नाही...रोजचा दिवस सारखाच समजून सर्वसामान्य माणूस जगत असतो अथवा दिवस पुढे-पुढे ढकलत असतो अस म्हणूया ...

   असाच वीकेंड होता सहज दुपारची वेळ होती, कंटाळा आलेला क्रिकेट मॅच देखील कोणती नव्हती टीव्ही वर. म्हणून टीव्ही कडे लक्ष ही द्यायचा प्रश्न नव्हता...म्हणूनच मोबाईल कडे हात आपोआपच वळला. मोबाईल मध्ये YouTube प्ले करून song ऐकू लागलो...

    काही song प्ले होऊन झाल्यावर कोणात तरी जुन गाणं सुरु झाल... आणि गम्मत म्हणजे गाणं ऐकताना मी कधी माझ्या गत आयुष्यात गेलो हे देखील मला नाही समजले, म्हणजे असे की जुना प्रसंग सगळे आपापल्या कामात आहेत सगळे नॉर्मल पण जसाच्या तसा...?पण तोच प्रसंग किवा त्यावेळेस मला घेऊन जायच कारण...?अचानक का आठवल असेल ते...?

तर कारण अस की मी ज्यावेळी you ट्यूब वर ते गाणं ऐकत होतो तेच गाणं मी माझा भूतकाळातील आयुष्यात ऐकले होतो आणि जेव्हा का मी आता हे गाणं ऐकायला लागलो त्यावेळी तोच आहे तसा प्रसंग आठवला...


हो खरंच असं कित्तेक वेळा माझ्यासोबत होतय... काही गाणी तर अशी भासतात आपण सध्या ईथे नाहीतर भूतकाळात जिथे पहिल्यांदा हे गाणं ऐकलं आहे ,तिथेच आहे.

गाण्याबरोबर एक गोष्ट अजून आहे...जी मला/आपल्याला भूतकाळातील आठवण करून द्यायला पुरेशी आहे.

ती गोष्ट म्हणजे सेंट...

    बघा आपण कुठेतरी प्रवासाला गेला असेल आणि तेव्हा तुम्ही जाताना सोबत सेंट किंवा बॉडी स्प्रे घेऊन गेला असेल आणि तोच सेंट चा सुवास जर तुम्हाला कधी आलाच तर नकळत तुम्ही भूतकाळातील प्रवासात परत हरवून जाल हे नक्की..

त्यामुळे जर तुम्ही कोणता ट्रीप चा प्लॅन करत असाल तर नक्की आवडीची काही गाणी आणि सेंट न्यायला विसरू नका... काही भूतकाळातील गोष्टी फोटो पाहून नाहीतर अश्याही अनुभवास मिळतात.

तुम्हाला ही काही गाणी ऐकल्यावर old memories आठवतात का ..?





- सुदन जाधव 


सरत्या वर्षाला निरोप देताना...

      ए क वर्ष एका पुस्तका सारख असतं. नवीन वर्ष आणि नवीन पुस्तक, आणि पुस्तकातले प्रत्येक पान म्हणजे आपला रोजचा दिवस. पुस्तकातल प्रत्येक एक प...