Wednesday, June 30, 2021

स्टोव्ह...

    पूर्वी चुलीवर स्वयंपाक होत. पाणी तापवण्यासाठी बंब असायचे. वीज गेली तर रॉकेलची चिमणी, कंदील पेटवत. कालांतराने लाकडाच्या चुलीची जागा रॉकेलच्या स्टोव्हने, पाणी तापवण्याच्या बंबाची जागा वॉटर हिटर, गिझरने तर चिमणी, कंदीलची जागा चार्जेबल बॅटऱ्यांनी घेतली. श्रीमंतांच्या घरी व मोठ्या हॉटेलांत दिसणारी गॅस शेगडी सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आली तेव्हापासूनच स्टोव्ह बाजूला सारले जात होते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून सर्वसामान्यांच्या घरांमध्ये गॅस शेगडी पोचली आहे; मात्र, सिलिंडरचे दर गरिबांच्या आवाक्‍यात नसल्याने रॉकेलच्या स्टोव्हचा वापर आजही काही प्रमाणात होत आहे.

स्टोव्ह चा वापर - 
    स्टोव्ह च्या टाकीमध्ये रॉकेल भरताना गाळण म्हणून सुती कापड अथवा नळकांडे म्हणजेच काहीजण त्याला नाळक म्हणतात ते वापरायचे. हवा भरण्यासाठी लहान हातपंप असायचा दाभना सारखिच लहान सळी आणि त्याला पुढे चामड्याचे वाशर असायची आणि वापरायच्या आधी गोडेतेल मध्ये भिजवून वापरावी लागे ,म्हणजेच Air प्रेशर पंप जितका चांगला असायचा तितकाच स्टोव्ह ची आग आपण सहजरीत्या वाढवू शकत होतो. 
सुरू झाला की फर्ररऽऽ असा आवाज करायचा. 


    कधी कधी काजळी मुळे स्टोव्ह कमी पेटायचा तर तो ब्लॉकेज काढायला एक पिन असायची. जो नोजल साफ करायचा टोचण देऊन.आगीचा झोत कमी करण्यासाठी एक चावी असायची जी सुलट् फिरवून मोकळी करायची म्हणजे Air प्रेशर कमी होऊन आगीचा झोत कमी व्हायचा.
     स्टोव्ह दुरुस्तीच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. सॉल्डरिंग, बर्नर बदलणे व साफ करणे, वायसर बदलणे अशा कामांचे रोजचे 200 ते 300 रुपये मिळत होते. आता दिवसभर दुरुस्तीचे कामच नाही. गॅस शेगडीला मेंटेनन्सची जास्त गरज नसल्याने ती कामे अपवादाने मिळतात.
    गरिबांना सिलिंडरची किंमत एकरकमी 800 रुपये परवडत नाही. एक लिटर रॉकेल तीन-चार दिवस पुरते. रॉकेल पुन्हा चालू केल्यास स्टोव्हची विक्री वाढू शकेल.



-सुदन जाधव 


सरत्या वर्षाला निरोप देताना...

      ए क वर्ष एका पुस्तका सारख असतं. नवीन वर्ष आणि नवीन पुस्तक, आणि पुस्तकातले प्रत्येक पान म्हणजे आपला रोजचा दिवस. पुस्तकातल प्रत्येक एक प...