भटकंती मला यावर थोड बोलायच आहे. नकळत थोडा मनात विचार येऊन गेला. भटकंती तर सगळेच करतात. हा ,कोण म्हणेल भटकंती म्हणाल तर हिंडणे-फिरणे, किल्ल्यांची सैर, अनोळख्या जागी फिरायला जाणे म्हणजेच मन म्हणेल त्या ठिकाणी आपल्या इच्छेप्रमाणे भ्रमंती करणे.
पण...आयुष्याची भटकंती यावर बोलायच झाल तर मनात कोणता विचार येतो..? आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक जण आपल्यापरीने आपापले आयुष्य जगत असतो.मग, आयुष्याची भटकंती कुणाची चुकली आहे का..? काय भाऊ तू पण ना...
जिने के है चार दिन, बाकी है बेकार दिन...असच काहीतरी वाटलं असेल ना.
आयुष्याची संघर्षाची भटकंती जशी की वेलीवरच्या फुलपाखरा सारखी ...
म्हणजेच जस फुलपाखरू झाडाच्या खोडावर एक छोटासा मातीचा ढिगारा बनवत आणि त्यामधे प्रथम जन्माला येते ती अळी, आणि काही दिवसानंतर ती अळी बाहेर येऊन त्याच फुलपाखरू बनत त्याचप्रमाणे प्रत्येक जण हा स्वतः च्या आयुष्याला कलाटणी देऊन जगत असतो.
पण कोणी पाहिल असेल तर, फुलपाखरासारखा चा मातीचा ढिगारा बाहेरुन कोणी पोखरला तर त्याला आत मिळणार ती अळी आणि मात्र तेच जर मातीच कवच आतून फुटले तर त्यातून बाहेर येणार ते सुंदर सगळ्यांना हवहवस, सगळ्यांच लक्ष वेधुन घेणार फुलपाखरू...
त्यामुळे स्वतःच ठरवा, तुम्हाला आयुष्याच्या संघर्षात दुसर्यांची मदत घेऊन अळी व्हायचय,की स्वतः लढून फुलपाखरू व्हायचय...
-सुदन जाधव