Thursday, October 7, 2021

मरणाच्या ठीक आधी...

    आपले आयुष्य किती आहे आजच्या युगात असा कोणी प्रश्न केला तर साहजिकच उत्तर येईल की 40-50 वर्ष. हो मग ईतक असताना कशाला पाहिजे क्रोध,लोभ,मोह,मद् आणि मत्सर...? माणूस हा वेळ असल्यावर किंमत करत नाही कोणत्याही गोष्टीची..... शेवटी समझत त्याला आयुष्य म्हणजे काय... 

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...

आयुष्य एकदाच मिळत ...

मरणाच्या ठीक आधी आठवतात नाती-गोती सर्व, ज्यांचा सोबत बोलून  लोटला होता पर्व....


मरणाच्या ठीक आधी वाटत, काश देव अजून थोडा वेळ देऊदे मला, ज्यांच ज्यांच मन दुखावल त्यांना भेटून माफी मागायला...


मरणाच्या ठीक आधी आठवते आपली जन्मभूमि, आपण लावलेली रोपे आणि आपल सोन्यासारख घर, ती सायकल आणि मित्रांना घेऊन टायर पळवायची केलेली लांबची सफर...


मरणाच्या ठीक आधी मन म्हणत असत आपल्या माणसांना मनापासून पाहून घेऊ शेवटी एकदा, कधी न संपणाऱ्या प्रेमाच्या गोष्टी बोलूयात एकदा...


मरणाच्या ठीक आधी माजतो काहूर मनात की आता नाही होणार भेट कधी आपल्या लोकांची, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा म्हणायची...


मरणाच्या ठीक आधी आठवते आई वडिलांच्या अंगा- खांद्यावर गेलेल बालपण,  आणि कुटुंबाची जबाबदारी घेताना वय झाले दहा वरुन सत्तावन्न...


मरणाच्या ठीक आधी आठवते की आता कुठेतर जीवनाची सुरुवात होणार होती,तेव्हाच मला माझी जिंदगी अलविदा म्हणत होती...




-सुदन जाधव

सरत्या वर्षाला निरोप देताना...

      ए क वर्ष एका पुस्तका सारख असतं. नवीन वर्ष आणि नवीन पुस्तक, आणि पुस्तकातले प्रत्येक पान म्हणजे आपला रोजचा दिवस. पुस्तकातल प्रत्येक एक प...